सामाजिक

कन्नमवार विद्यालयात राखी प्रदर्शनी

Spread the love

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : कन्नमवार विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांचे प्रदर्शनी लावण्यात आली होती विविधरंगी राखी सर्वांसाठी आकर्षण ठरल्या.कला शिक्षक प्रकाश निखारे यांनी राख्या कशा बनवायच्या याचे प्रात्याक्षिक दाखविले.त्यानुसार आवश्यक साहित्य वापरून विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या बनविल्या,शाळेच्या वर्यांड्यामध्ये प्रदर्शनी मांडण्यात आली होती शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेमीला उईकें पर्यवेक्षक कपिल ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पौर्णिमेच्या सणासाठी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधायला उत्सुक असतात बहुतेक जणी बाजारातून शोभिवंत राखी आणतात या ऐवजी कल्पकतेने आपल्याच हाताने राखी तयार करून ती बांधण्याच्या आनंद वेगळाच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या साहित्यातून सुंदर राखी तयार करण्याच्या कल्पकता मोठ्या उत्साहाने पार पडला, कला गुणांना वाव देणारा स्तुत्य उपक्रम गेल्या 21 वर्षापासून शाळेत फार मोठ्या उत्साहाने सातत्याने विद्यार्थ्यांना पर्यावरण बाबत जागरूक केले जाते . अनेक विद्यार्थी घरातील टाकाऊ साहित्य वापरून सुंदर राख्या बनविल्या होत्या वापरात नसलेले पुठ्ठे,कागद , आगपेटी, कापड, आईस्क्रीमच्या काड्या, बटणे, दोरा ,लोकरी अशा अनेक टाकाऊ वस्तू एकत्र करून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाट मोकळी करून अनोख्या राख्या तयार केल्या मुलांनी तयार केलेल्या तीन उत्कृष्ट राख्यांची निवड करण्यात आली त्यांना बक्षीस म्हणून सुवर्ण पदक देण्यात आले. त्यात इयत्ता पाचवी ते सातवी शहरोज खान प्रथम कु.अनम शेख रियाज, द्वितीय कु. तासबिया फातेमा , कू.परी ढगे प्रोत्साहन व इयत्ता आठवी ते दहावी मधून गजेंद्र चितोडिया प्रथम कु. सोनम शाहू दुतीय कु. झुबिया माहीम,कु. अश्मिरा नविश यांनी प्रोत्सानपर बक्षीस पटकावला. प्रास्ताविक कला शिक्षक यांनी तर आभार प्रदर्शन संदीप खंदाते यांनी पार पडला,कार्यक्रम यशस्वी करीता सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान लाभले..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close