शैक्षणिक

जुन्या पेन्शन साठी विधान भवनावर १२ महामोर्चा

Spread the love

 

जुन्या पेन्शन चा मुद्दा महाराष्ट्रातील सत्ता समीकरण बदलवणार – डॉ नितीन टाले

अमरावती / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी एकजूट होऊन जुन्या पेन्शनच्या मागणी करिता येत्या 12 डिसेंबरला भव्य जनक्रांती मोर्चाचे आयोजन केलेले आहे. जुनी पेन्शन हक्क संघटने द्वारे आयोजित या मोर्चाच्या नियोजनाची बैठक नुकतीच नांदगाव खंडेश्वर येथे पार पडली.
या आंदोलनाला 78 संघटनांचा पाठिंबा असून महाराष्ट्रातील प्रशासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात या जनमोर्चा मध्ये सहभागी होणार आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालात जुन्या पेन्शनचा मुद्दा निर्णय ठरलेला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे 58 सदस्य 5000 पेक्षा कमी मताने निवडून आलेले होते जुन्या पेन्शन चा निर्णय सरकारने न घेतल्यास या जागा टारगेट करून सरकारवर दबाव आणण्याची भूमिका जुनी पेन्शन हक्क संघटनेने घेतलेली आहे त्यामुळे जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सत्ता समीकरण बदलणार असे मत या बैठकीचे अध्यक्ष म्हणून बोलताना जुनी हक्क पेन्शन संघटनेचे प्रवक्ते डॉ नितीन टाले यांनी व्यक्त केले.
त्यामुळे 12 डिसेंबर चा जनक्रांती मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
जनक्रांती मोर्चाच्या पूर्वतयारी करता आयोजित बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व विभागीय शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजर राहण्याचे आवाहन संघटनेचे विभागीय संघटक आशिष धुळे यांनी केले.
या बैठकीला प्रामुख्याने रुपेश देशमुख, सुमित शिंगारे, वीरेंद्र कलपट, संदीप डोफे, प्रा. जयंत वडतकर, जगदीश गोवर्धन, विठ्ठल जाधव, संजय मुंडे, पंकज गोरले, दीपिका धवणे, प्रा शाम दळवी, प्रा नितेश चोरे, गणेश राठोड, श्रीकांत राजनकर व प्रशासनाच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप डोफे यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close