छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यान, रथोत्सव पदयात्रा

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई
नेर येथे श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्तान यांनी गणपती मठाच्या समोरील भागात रोडच्या बाजूने शिवचरित्र व शंभूचरित्राचे गाढे अभ्यासक श्री शिवप्रतिष्ठान सांगली येथील सुनील बापू लाड यांचे छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्या जीवन कार्याचा उजाळावर प्रखर असे व्याख्यान केले.या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान च्या कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास राखडे व पाहुण्याच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्या अर्पण, पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दहा मार्चला नगरपरिषदे जवळपास असलेल्या नेताजी चौकातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. ही रॅली बारीपुरा,तेलीपुरा, मारवाडी चौक, शिवाजी शाळा येथून छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ या रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये शिवप्रतिष्ठानच्या अनेक युवक व युवतीचा सहभाग दिसून येत होता.