समुद्रात आंघोळ करणे जीवावर बेतले ,तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

रायगड / नवप्रहार ब्युरो
मौज मजेसाठी समुद्राकाठी जाणे आणि पाण्याचा मोह न आवरल्याने समुद्रात पोहण्यासाठी उतरणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. समुद्राच्या लाटेत बुडून या तिघांना जलसमाधी मिळाली आहे. मयत तीन मुलांपैकी दोन सख्खे भाऊ असून एक त्यांचा नातेवाईक आहे. यातील दोन तरुण हे शेकाप पदाधिकारी संतोष पाटील यांचे चिरंजीव आहेत तर एक तरुण नातेवाईक आहे. या घटनेमुळे संतोष पाटील यांचेसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. .
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील समुद्रात 19 एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये मयुरेश संतोष पाटील (वय २३ वर्षे), अवधुत संतोष पाटील (वय २६ वर्षे) या दोन सख्ख्या भावांचा मृतांमध्ये समावेश आहे. दोघेही म्हसळा तालुक्यातील गोंडघर गावामध्ये राहणारे होते. हिमान्शु पाटील (वय २१ वर्षे) याचा देखील मृत्यू झाला. हिमान्शु नवी मुंबईतल्य ऐरोलीमध्ये राहत होता.
समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या हिमांशु हा समुद्राच्या लाटेत गटांगळ्या खाऊ लागल्याने लागला.याला समुद्राने अक्षरशः आत ओढलं. वेगात येणाऱ्या लाटांसोबत तो गटांगळ्या खाऊ लागला. त्यावेळी त्याला पाहून मयुरेश पाटील आणि अवधूत पाटील हे दोघे सख्खे भाऊ त्याला वाचवायला पुढे धावले. मात्र समुद्राचे रौद्ररूप, जोरदार लाटा यामुळे समुद्राने देखील त्या दोघांना आपल्या कवेत घेतलं आणि अवघ्या काही क्षणातच तिघेही जण खोल पाण्यात दिसेनासे झाले.