Uncategorized

यशोगाथा … त्सुनामी ने घर हिसकावले पण त्यांचे स्वप्न तोडू शकले नाही 

Spread the love

यशोगाथा … त्सुनामी ने घर हिसकावले पण त्यांचे स्वप्न तोडू शकले नाही

                   ठरवलेले ध्येय आणि उदिष्ट साध्य करण्यासाठी जीवापाड आणि कठीण मेहनत करावी लागते. ज्याने त्याला नेमके काय करायचे आहे हा निर्धार करून योग्य मार्गाने मार्गक्रमण केले की तो आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होतो. याचे मूर्तीमंत उदाहरण रामनाथन बहिणींनी दिले आहे.

पीएससी नागरी सेवा परीक्षा ही केवळ देशातच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते, कारण दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेत बसतात, परंतु त्यापैकी फक्त १०००-१२०० उमेदवारांचीच निवड होते.

हजारो उमेदवार प्रीलिम्स परिक्षामध्येच नापास होऊन जातात. त्याच वेळी, काही उमेदवार असे आहेत जे या परीक्षेत यशस्वी होतात आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत बनतात. ईश्वर्या रामनाथन आणि सुष्मिता रामनाथन देखील त्यापैकी एक आहेत, ज्यांची कहाणी सर्वांना प्रेरणा देते. चला तर मग जाणून घेऊया हे दोघे कोण आहेत आणि त्यांची यशोगाथा काय आहे…

ईश्वर्या रामनाथन आणि सुष्मिता रामनाथन या बहिणी आहेत ज्यांनी गरिबी आणि कठीण परिस्थितीला तोंड देत यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या दोन्ही बहिणींची जीवनकथा आपल्याला सांगते की आपण कधीही आपल्या स्वप्नांना सोडू नये आणि कठोर परिश्रम करत राहिलं तर, आपल्याला नक्कीच यश मिळेल.

त्सुनामीमध्ये झाल्या बेघर

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या ईश्वर्या आणि सुष्मिता एका गरीब कुटुंबात वाढले. त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. २००४ मध्ये हिंदी महासागरातील त्सुनामीमध्ये घर गमावल्याने या दोन्ही बहिणींच्या कुटुंबाला खूप दुःख सहन करावे लागले, परंतु ही भयानक आपत्ती या दोन्ही बहिणींच्या स्वप्नांना आणि त्यांच्या जिव्हाळ्याला तोडू शकली नाही.

ईश्वर्या रामनाथन बनली आयएएस

सर्वप्रथम, धाकटी बहीण ईश्वर्या रामनाथनने यूपीएससीमध्ये यश मिळवले. २०१८ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत तिने अखिल भारतीय ६२८ वा क्रमांक मिळवला, त्यानंतर तिची रेल्वे अकाउंट्स सर्व्हिस (आरएएस) साठी निवड झाली. तथापि, ती तिच्या रँकवर समाधानी नव्हती, म्हणून तिने २०१९ मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी ती केवळ २२ व्या वर्षी ४४ व्या रँकसह आयएएस अधिकारी बनली. तिला तामिळनाडू केडर मिळाला आहे.

सुष्मिता रामनाथन बनली आयपीएस

थोरली बहिण सुष्मितानेही UPSC साठी चांगली तयारी केली, परंतु तिची तयारी पुरेशी नव्हती, म्हणून ती तिच्या पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये अपयशी ठरली. तथापि, तिने हार मानली नाही आणि २०२२ मध्ये पुन्हा परीक्षेला बसली. यावेळी तिने ५२८ व्या क्रमांकासह परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची आयपीएससाठी निवड झाली. तिला आंध्र प्रदेश केडर मिळाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close