धर्म आनी राष्ट्राचे रक्षण करणे आणि सर्वधर्म समभाव बाळगणे हीच खरी राष्ट्रभक्ती – कमल छगाणी
कुऱ्हा. / प्रतिनिधि
सर्व धर्म समभाव ह्रदयात बाळगणे जितके आवश्यक आहे तितकच आवश्यक आहे आपल्या स्वराष्ट्र,स्वधर्माचे रक्षण करणे आणि राष्ट्र विरोधी शक्तींपासून संरक्षण करणे गरजेचे आहे सर्व धर्म समभावाच्या नावाने जर कोणी राष्ट्राला व हिंदुत्वाला धोका निर्माण करत असेल किंवा सम्पविण्याचे स्वप्न पहात असेल तर अश्या राष्ट्र,धर्म व हिंदुत्व विरोधी दृष्ट शक्तींचा तिव्र विरोध व मुकाबला करून देव,देश व धर्म टिकून राहावा म्हणून सज्जन शक्ती व राष्ट्र भक्तांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन करावे असे प्रतिपादन धर्म जागरण प्रांत कार्यकारिणी चे कमल छांगाणी यांनी अंजनसिंगी येथे केले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते ते म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही प्रखर राष्ट्र भक्त संघटना आहे संघाजवळ राष्ट्र भक्तीचा कधीच न आटणारा झरा आहे
याप्रसंगी मंचावर तालुका कार्यवाह राहुल बिजवे ,प्रमुख अतिथी म्हणून मोतीराम ठोंबरे उपस्थित होते
छांगाणी म्हणाले की देशापुढे,समाजापुढे अनेक संकट आहेत परंतु या संकटाना सक्षम पणे पेलून भारताला पुन्हा परम वैभावाकडे वाटचाल करताना पहायचे आहे त्यामुळे सज्जन शक्ती ने एकत्र येण्याची नितांत गरज आहे
धर्मातर म्हणजे राष्ट्रांतर असून आई जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,स्वामी विवेकानंद यांचा ही धर्मातरणला प्रखर विरोध होता
उपस्थित महिला भगिनींना छांगाणी यांनी विनंती केली की आपण ही राष्ट्र कार्यात तत्परतेने सहभागी व्हावेत सोबतच या ईश्वरी कार्याकरिता घरातील पुरुष मंडळीला प्रोत्साहन द्यावेत प्रमुख अतिथी ठोंबरे यांनी संघाला राष्ट्र भक्तीबाबत देशातील उल्लेखनीय कार्य करीत असल्याचे सांगून संघात राष्ट्र भक्ती सोबतच संस्कार,संस्कृती ,उत्तम आचार,विचार शिकवल्या जात असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला
यावेळी गावातून पथसंचलन व उत्सव स्थळी व्यायाम योग, प्रयोग चतुस्क,भूमिवंदन प्रात्यक्षिके सांघिक गीत, सुभाषित,अमृतवचन झाले
प्रास्ताविक,संचालन व आभार आदित्य वानखडे यांनी मानले