इंधन बचत काळाची गरज – आशा वासनिक आगार व्यवस्थापक
मोर्शी(तालुका प्रतिनिधी)दि.१७/१
इंधन बचत ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन एस. टी. आगार व्यवस्थापिका आशा वासनिक यांनी इंधन बचत मास कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दि.१६ जानेवारी ते दि.१५ फेब्रुवारी दरम्यान राज्यभर एसटी महामंडळाच्या वतीने इंधन बचत मास राबविल्या जात असते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापिका आशा वासनीक, प्रमुख अतिथी म्हणून मोर्शी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक प्रकाश गंडोधर व शांतनु खैरकर, मोर्शी तालुका पावर ऑफ मीडियाच्या अध्यक्ष संजय गारपवार ,पत्रकार गजानन हिरूरकर व
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सहाय्यक कार्याशाळा अधीक्षक मनोज देशमुख , दीपक कोल्हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या हस्ते इंधन बचत मास फलकाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंधन बचत बाबत एसटीच्या चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी एस टी बस चे चालक प्रदीप जावरकर व मंगेश वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन निलेश निवल यांनी केले तर आभार प्रदर्शन धीरज मेश्राम यांनी केले.