सामाजिक

तडजोडीने ४० वर्ष जुन्या वादाचा अंत 

Spread the love

 

 

वि.प्र. अनिल डाहेलकर

मुर्तिजापूर – येथील सह दिवाणी न्यायालय येथे ४० वर्षापासुनचा जुना मालक व भाडेकरू यांच्या वादातील दावा रे.मु.क्र. ५७/२०१२ हा वादी व प्रतिवादी यांनी सामोपचाराने तडजोड केल्याने, सदरचा दावा तडजोड हुकुमनाम्याअन्वये कायमचा निकाली काढण्यात आला.

दावा मिळकतीचे मुळ मालक धनाजी देवताळे यांनी प्रस्तुतचा दावा प्रतिवादी प्रताप दुर्लभजी माडीया याच्या विरुध्द त्यांच्या जागेचा ताबा मिळण्यासाठी मागील ४० वर्षापुर्वी दाखल केला होता. सदर प्रकरणात न्यायालया मार्फत केल्या जाणा-या वेगवेळया आदेशाविरुध्द उभय पक्षकारांनी वेळोवेळी अपिल दाखल केल्याने, तसेच दाव्या दरम्यान येणा-या तांत्रीक व कायदेशीर अडचणींमुळे सदरचा ऐतीहासीक दावा मागिल ४० वर्षांपासुन उभय पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी प्रलंबित होता. सदर दाव्यात वादी व प्रतिवादीचे विधिज्ञ के. एन. माटे व डी. बी. मारवाल ज्यांनी उभयपक्षकारांमध्ये तडजोड व समेट करण्याच्या उद्देशाने न्यायालयासमोर प्रस्ताव सादर केला असता न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधिश ए. जी. तांबोळी यांनी उभय पक्षकारांमध्ये त्यांच्या विधिज्ञांच्या सहकार्याने व सामोपचाराने तडजोडीने दावा आज निकाली काढला. दाव्यातील वाद मिळकत ही प्रतिवादी भाडेकरीने एक रक्कम देवुन वादीकडून खरेदीने विकत घेतली म्हणुन उभय पक्षकारांना ख-या अर्थाने न्याय मिळाल्याची भावणा आज मुर्तिजापूर न्यायालयातील सर्वच विधिज्ञ व पक्षकार यांनी व्यक्त केली

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close