सामाजिक
मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. राजदीप व प्रा. डॉ.मंगेश बनसोड यांना महात्मा गांधी पुरस्कार

नेर:- नवनाथ दरोई
मुंबई : महात्मा गांधी यांच्या १५४व्या जयंती दिनानिमित्त मुंबई विद्यापीठातील संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सुंदर राजदीप व अकॅडमी ॲाफ थिएटर आर्टसचे प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांना येथील ‘पिपल्स आर्ट सेंटर (रजि.)’तर्फे सोमवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार सेंटरतर्फे आयोजित समारंभात आ. संजय पोतनीस यांच्या हस्ते उच्च शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. राजदीप व डॉ. बनसोड यांना देण्यात आला. याप्रसंगी ‘पिपल्स आर्ट सेंटर’चे सचिव गोपकुमार पिल्लई व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रामाणिकपणाने केलेल्या कार्याचा हा विजय असल्याची भावना यावेळी डॉ. राजदीप व्यक्त केली तर अशा पुरस्कारांनी पुन्हा नवीन काही करायला ऊर्जा मिळते, अशी भावना डॅा.मंगेश बनसोड यांनी व्यक्त केली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1