सिरीयात सत्तापालट ; बशर अल-असाद चे पलायन
14 वर्षाच्या मुलाने चित्रातून दिले हिते संकेत
सीरिया / एनपी इंटरनॅशनल डेस्क
सिरीयात राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांची सत्ता संपुष्टात आली आहे. सीरियात बंडखोर गटांनी रविवारी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. यासह, दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्धानंतर बसर अल-असादची सत्ता संपुष्टात आली. असाद देश सोडून रशियात पळून गेले आहेत.सीरियात बंडखोर गटांनी रविवारी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. यासह, दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्धानंतर बसर अल-असादची सत्ता संपुष्टात आली. सीरियात लोकशाहीच्या स्थापनेसाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे रूपांतर गृहयुद्धात झाले आणि हजारो लोकांना यात आपले प्राण गमवावे लागले.
सीरियात या चळवळीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा एक नाव समोर येते ते म्हणजे मौविया स्यास्नेह. 14 वर्षांची मौविया स्यास्नेह ही तीच व्यक्ती होती ज्याच्या पेंटिंगने सीरियामध्ये चळवळ सुरू झाली होती. 13 वर्षांपूर्वी, मौविया स्यास्नेह या 14 वर्षीय मुलाने 2011 मध्ये सीरियातील दक्षिणेकडील सीरियन शहरात एक चित्र रेखाटले होते. त्यावर “अजाक एल डोर” म्हणजे ‘आता तुमची वेळ आहे, डॉक्टर’ असं लिहिलं होतं. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचा डॉक्टर असा उल्लेख करण्यात आला होता. हा तोच काळ होता जेव्हा अनेक अरब आणि आफ्रिकन देशांमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
मौविया स्यास्नेहला पोलिसांनी 26 दिवस कोठडीत ठेवले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी बसर अल-असदच्या पोलिसांनी अनेक ठिकाणी गोळीबारही केला. मौविया स्यास्नेहच्या समर्थनार्थ चळवळीदरम्यान सीरियामध्ये फ्री सीरियन आर्मी उदयास आली. ज्यामध्ये असदच्या सैन्यातून पळून गेलेले अनेक लोक सहभागी झाले होते. या बंडाचा फायदा अतिरेकी गटांनीही घेतला, त्यामुळे अनेक भागात हिंसाचार आणखी पसरला.
2011 हे वर्ष सीरियासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. यावेळी हजारो सीरियन नागरिक लोकशाहीची मागणी करत रस्त्यावर उतरले. मात्र त्यांना प्रचंड सरकारी दडपशाहीला सामोरे जावे लागले. तथापि, सरकारच्या विरोधात विविध सशस्त्र बंडखोर गट तयार झाले आणि 2012 च्या मध्यापर्यंत, बंडखोरी पूर्ण प्रमाणात गृहयुद्धात रुपांतरित झाली.
असद यांनी आंदोलन चिरडण्यासाठी केलेल्या चुकांमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. रशिया, इराण आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाहच्या मदतीने असदने बंडखोर गटांशी अनेक वर्षे यशस्वीपणे लढा दिला. पण अलीकडे अचानक सक्रिय झालेल्या बंडखोर गटांनी सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खूप अडचणी निर्माण केल्या. कारण असद यांचे तीन मित्र रशिया, हिजबुल्ला आणि इराण आणि इस्रायल हे आपापल्या संघर्षात अडकले होते. हीच संधी हेरुन बंडखोरांनी असद यांची सत्ता उधळून लावली.