खापरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद व सत्कार सोहळा संपन्न
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार.
घाटंजी-खापरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद सोबतच काही सत्कार मूर्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक वर्षांच्या अखेरीस, प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुद्धा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा_या राज्यगितावार सादर केलेले नृत्य हे उपस्थितांचे लक्ष वेधणारे होते तर, इंग्रजी विषयाचा सादर केलेल्या परीपाठाचे उपस्थित पाहुण्यांनी भरभरून कौतुक केले. नृत्य व परिपाठाकरीता विद्यार्थ्यांना शिक्षिका फुटाणे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला साखरा केंद्राच्या केंद्रप्रमुख छायाताई बन्सोड यांचे शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून खापरी गावाच्या सरपंचा कल्पणाताई काकडे, होत्या त्यांचा सत्कार शाळा समिती कडून करण्यात आला.सोबतच मूळचे खापरी गावचे असलेले, पांढरकवडा पंचायत समितीला प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून सेवा निवृत्त झालेले, संजयजी इंगोले यांचे सह से. नि. शिक्षक नारायणराव भोयर, स्मिताताई भोयर, रमेश राठोड, उमादेवी बुटे व शिक्षण प्रेमी सचिन मोहजे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खापरी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चावरे होत्या. कार्यक्रमाला स्वागत गीत शाळेचे मुख्याध्यापक मेंगेवार सरांनी गायले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक हनुमानजी कुमरे सरांनी केले,आभार प्रदर्शन कू. प्रगती फुटाणे यांनी केले.५ व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या निरोप समारंभाला वर्ग शिक्षिका कू. फुटाणे यांनी विद्यार्थ्यांना वाटर बॉटल भेट म्हणून दील्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता शाळेतील शिक्षिका, कू. माया भोयर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व खापरी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.