क्राइम

स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुंतागुंत वाढली

Spread the love

आरोपीच्या वकिलांचे म्हणणे बलात्कार झालाच नाही 

तर दुसरीकडे आरोपी दत्ता गाडे समलैंगिक असल्याची चर्चा 

पुणे / नवप्रहार ब्युरो 

              स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुंतागुंत वाढत चालली आहे. आरोपी गाडे चे वकील यांचे म्हणणे आहे की त्यांच्या अशीलाने ने तरुणीवर बलात्कार केला नाही.तर त्यांच्यात आपसी सहमतीने संबंध प्रस्थापित झाले आहेत. गाडे यांच्या वकिलांच्या म्हणण्या नुसार मुलीने त्यासाठी साडेसात हजार रुपये घेतले आहेत.त्याठिकाणी तिचा एजंट उभा होता. पैश्यावरून वाद झाल्याने हिं तक्रार दाखल करण्यात आली आहे.असे गाडे याच्या वकिलांचे म्हणणे आहे.

 पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. काल कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दत्ता गाडे याला शिरुरमधून त्याच्या मुळगावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अशातच आरोपीचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणात वेगळं वळण लागलंय की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपो मध्ये झालेली होती. मी तिला कुठलीही बळजबरी केलेली नाही. ती स्वतः मला म्हटली, तेव्हा मी बसमध्ये आम्ही गेलो. साडेसात हजार रुपये तरुणीने घेतले, असं दत्तात्रय गाडे याने आपल्या वकिलांना सांगितलं आहे. त्याठिकाणी त्या तरुणीचा एजंटही असल्याची माहिती गाडीने आपल्या वकिलांना दिली. दोघांमध्ये पैशांचा वाद होता. त्यामुळे तरुणीने आरोप केल्याचा दावा वकिलांनी केला आहे.

कॉल रेकॉर्डस काढा – आरोपीचे वकील

पिडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं होतं. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल, असंही आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. दत्ता गाडे हा पळून गेला नाही तर तो आपल्या गावी गेला. गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आल्याने तो दडून बसला होता, अशी माहिती देखील आरोपीच्या वकिलांनी दिली आहे.

आणखी Pune Swargate : ‘अहो साहेब मी तो नव्हेच…’, पोलिसांना वाटलं दत्ता सापडला, ‘राम आणि श्याम’ पाहून 15 मिनिटं उडाला होता गोंधळ

दरम्यान, आरोपी जेरबंद झाल्यानंतर आता या अत्याचार प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपीला संबंधित पीडित तरुणीवर अत्याचार करायचाच नव्हता, अशी नवी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. आरोपी रात्रभर बस स्थानकात फिरायचा आणि सावज हेरायचा. अशातच तरुणीने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 आरोपी समलैंगिक संबंध ठेवायचा ? – पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. काल कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून सुखाने संसार सुरू केला होता. त्याला सात वर्षांचा मुलगादेखील आहे.

मात्र, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तो कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नीशी व कुटुंबीयांशीही त्याचे सातत्याने वाद सुरू होते. त्याचा भाऊ शेती करतो. मात्र, आरोपी शेतीकडेही लक्ष न देता विविध ठिकाणी फिरत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे.घटनेच्या दिवशी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलिसांचे एक पथक थेट त्याच्या घरी चौकशीस आल्यानंतर त्यांनी आरोपीसारखे साधर्म्य असलेल्या भावाला उचलून तपास सुरू केला. ही माहिती आरोपीलादेखील समजली. कधीही न बोलणाऱ्या चुलत भावाचा त्याला फोन आला. या वेळी त्याने घरी आई पडल्याचे सांगितल्याने आरोपीला संशय आला व त्याने त्याचा फोनच बंद करून पलायन केले. याचदरम्यान गुन्हे शाखेचे पथक व स्वारगेट पोलिसांनी आरोपीच्या गावाच्या परिसरातील शेताकडे तो गेल्याची माहिती मिळाल्याने शोध सुरू केला. पोलिसांची १६ ते १७ पथके, ग्रामस्थ, पोलिस पाटील, गावातील तरुणांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्याचसोबत जवळपासच्या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनाही बोलावून पोलिसांनी साडेतीन हजार लोकांची बैठक घेत त्यांना शोधमोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले

श्रीगोंदा, दौंड, स्वारगेट, अहिल्यानगर भागात तो बसस्थानक, रेल्वेस्थानक येथेदेखील यापूर्वी फिरल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्याचे मित्र, नातेवाइकांची मुक्काम ठिकाणेदेखील पोलिसांनी शोधून काढली होती.आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत वर्षभरात तो नेमका कुठे कुठे फिरलेला आहे, त्याने कुणाला अधिक प्रमाणात संपर्क केला, त्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्याची स्वभाववैशिष्ट्ये काय आहेत, यावरून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला होता. पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनिशिंगणापूर आदी ठिकाणी तो मागील काही काळात गेल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी या ठिकाणी पोलिस पथके पाठवण्याची तयारी केली होती.

गुनाट गावाच्या परिसरातील १०० ते १५० एकर परिसरात घनदाट ऊस क्षेत्र असल्याने पोलिसांना तपासकामात अडचणी येत होत्या. याचा फायदा घेऊन आरोपी सुरुवातीला उसाच्या शेतात मळकट कपडे, अनवाणी पायाने आतल्या भागात फिरत राहिल्याने पोलिसांना तो सापडला नाही. या कालावधीत तो शेतातील ऊस व टोमॅटो खाऊन राहत होता. परंतु पाणी व भूक अधिक लागल्याने तो शेतातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला दोन ग्रामस्थांना दिसला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close