शेंदूरजनाघाट मध्ये शांतता समितीची बैठक संपन्न
वरूड / दिनेश मुळे
शेंदूरजनाघाट पोलिस स्टेशन च्या वतीने पोलिस स्टेशन हद्दीतील दुर्गा विसर्जना निमित्ताने ठानेदार सतीश इंगळे यांच्या कडुन रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पोलिस स्टेशन आवारात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पांडे, शे.घाट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शे.घाट शहरातील शांतता समितीचे समस्त सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरीक, पोलिस स्टेशनचे कर्मचारी , नगरपरिषदेचे कर्मचारी, प्रत्येक गावातील सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, दुर्गा मंडळाचे पदधिकारी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीला उपस्थितांना मार्गदर्शन करताना मिरवणुकी दरम्यान येणा-या अडचणी व विसर्जना वेळी येणा-या अडचणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी समजुन घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले तर अप्पर पोलिस अधिक्षक यांनी मार्गदर्शन करते वेळी सांगितले की आपले सन उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करून शहरात शांतता , कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे. पोलिस प्रशासन सगळ्या गोष्टी लक्षात घेत पुर्ण ताकतीने तुम्हाला नक्की सहकार्य करेल. ज्या प्रमाणे आपण नऊ दिवस मोठ्या श्रद्धेने व भक्तीने देवीची सेवा करतो हिच श्रद्धा आणि भक्ती मनात बाळगून मातेचे विसर्जन करावे जेणेकरून कुठलेही गालबोट या विसर्जनावेळी लागु नये. शांतता कमिटीच्या सदस्यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या मिरवणूकीत सहभागी होऊन आपल्या परिसरातील मंडळातील सदस्यांना मार्गदर्शन करायचे आहे. जेणेकरून युवा व तरूण पिढी आपल्या मार्गदर्शनात आपली संस्कृती विसरणार नाही.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर खडसे यांनी केले तर सर्व मान्यवारांचे आभार ठानेदार सतीश इंगळे यांनी मानले आहे.