कळंब येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री केल्या तीन घर फोड्या
अरविंद वानखडे
यवतमाळ ( वार्ता )
कळंब शहर येथे एकाच रात्रीतून तीन घर फोड्या झाल्याने कळंब वासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कळंब येथील महावीर नगर मध्ये वात्सव्यात असलेले प्रमिला धरणे (52) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून साठ हजारांचे सोन्याची दागिने, 3000 चे चांदीचे दागिने व आठ हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर लगेचच, राजे नगर येथील काशिनाथ मुनेश्वर (55) यांच्या घरात घुसून 22 हजार पाचशे रुपयांचे सोने चांदीचे दागिने सहा 2000 असा एकूण 24 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
हरणेले आउट मध्ये किसन बोबडे यांच्या घरावर सुद्धा या चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेऊन कुलूप तोडून आत प्रवेश केला अलमारी मध्ये ठेवलेले साडेतेरा हजार रुपये व काही सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. कळम शहरात एकच रात्री तीन घर पुढे झाल्याने पोलीस सुद्धा हतबल झाले सर्व अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केलेला आहे.