पोळा व गणपतीची तयारी अंतिम टप्प्यात
मातीकाम करणारी कुंभार रंगरंगोटीत व्यस्त
मातीचेच बैल,गणेशमुर्ती ग्राहकांणी घ्यावी कुंभार समाजाची मागणी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
शेतकरी वर्गाचा पोशिंदा सर्जा राजाचा मानसन्मानाचा व शेतकरी वर्गास जिवाभावाचा सन पोळा अवघ्या तीन चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळ्या आधी खांदसेकनीला शेतकरी बैलास आवतन देत आमंत्रित करतत त्यांची आपल्या शेतीच्या कामासाठी लाभलेली मेहनत व साथ यांची कृतज्ञता म्हणून बैलास पुजा पाठ करतात त्यासाठी खास करून विदर्भात मातीच्या बैलांची विक्री जोमाने होते यासाठी कुंभार मातीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध करून देतात व त्यातुन त्यांचाही उदरनिर्वाह व आवक वाढली जाते.पोळा झाला की लगेच ‘गणपती बाप्पा’येत असल्याने कुंभार रंगरंगोटीत व्यस्त होतो अशा मातकाम करणारी कुंभार रंगरंगोटीत आता अंतिम टप्प्यात मग्न झालेली आहे मात्र मातकाम करणारी कुंभार समाजा कडून पि.ओ.पी चे बैल,गणपती बाजारात उपलब्ध होत असल्याने ग्राहक रंगावर आकर्षित होत असल्यामूळे कुंभार समाजावर आर्थिकदृष्ट्या संकट ओढावला आहे.मातीकाम कमी होत असल्याची खंत व्यक्त होत असून ग्राहकांनी केवळ मातीचीच मुर्ती घ्यावी व पर्यावरण रक्षण सोबत कुंभार समाज उपजीविकेला हातभार लावला जावा ही मागणी मातीचे मुर्तीकार करणाऱ्या कडून होत आहे.