त्याने बायकोवर संशय असल्याने लावला ड्रोन कॅमेरा आणि …

बीजिंग / नवप्रहार डेस्क
शंका ही अनेक समस्या उत्पन्न करते. आपल्या बायकोवर एका नवऱ्याला ती थकत असल्याने संशय होता.त्यामुळे त्याने घरी बायकोला न सांगता तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याने ड्रोनचा वापर केला. यानंतर त्याला बायकोबद्दल त्याला जे समजले त्यानंतर त्याच्या बायको प्रती आदर वाढला.
असे काही लोक आहेत, ज्यांचे लग्नानंतरही इतर कुणासोबत तरी संबंध असतात. त्यामुळे काही लोक आपल्या जोडीदारावरही संशय घेतात. मग आपल्या लाइफ पार्टनरचं अफेअर तर नाही ना, याचा शोध सुरू होते. कुणी त्याचा पाठलाग करतं, कुणी त्याचा मोबाईल चेक करतं. पण एका व्यक्तीनं मात्र जोडीदारावर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला. त्यात त्याला जे दिसलं त्यामुळे धक्काच बसला. त्याला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसेनाचीनच्या हुबेई प्रांतातील शिआन इथं राहणारी ही 33 वर्षीय व्यक्ती. जिंग असं तिचं नाव. गेल्या वर्षभरात त्याला त्याची पत्नी बदलल्यासारखी वाटू लागली. पत्नीच्या आयुष्यात अनेक असामान्य घटना घडत होत्या. तिची कामाची स्थिती बदलली होती. ती त्याच्यापासून लांबलांबच राहत होती. आउटलेट नेटइझच्या वृत्तानुसार जिंग म्हणाला, की काहीवेळा तिनं जाणूनबुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ती अधिक वेळा बाहेर जाऊ लागली आणि बहुतेकवेळा तिनं आपण पालकांना भेटणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे जिंगला तिच्यावर संशय आला.
ड्रोनने पत्नीवर पाळत
जिंगने आपल्या पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला. त्याने ड्रोनचं फुटेज तपासलं. तेव्हा त्याची पत्नी कारमध्ये बसली आणि एका डोंगरावर गेली. तिथं ती दुसऱ्या माणसाचा हात धरून चालायला लागली. एका जुन्या मातीच्या घरात ती गेली. 20 मिनिटांनी ती घराबाहेर पडली आणि कारखान्यात गेली.
जिंगनं सांगितलं की ज्या व्यक्तीसोबत त्याची पत्नी होती ती व्यक्ती तिचा बॉस होती. दोघांना कारखान्यात भेटणं योग्य वाटलं नाही म्हणून बॉसने तिला जंगलात भेटण्याचा आग्रह केला. ड्रोनच्या माध्यमातून गोळा केलेले पुरावे घटस्फोट घेण्यासाठी उपयुक्त ठरतील, असं जिंग म्हणाला.
नेटिझन्स काय म्हणाले?
ही संपूर्ण घटना चिनी सोशल मीडियाच्या वेइबो प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, लोकांनी त्याच्या पत्नीवर पाळत ठेवण्याच्या ट्रिकचं कौतुक केले आहे. एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं की, या हायटेक युगात प्रत्येक खोटं पकडलं जाईल. त्यामुळे जोडप्यांनी निष्ठा राखली पाहिजे. या घटनेमुळे ड्रोनच्या असामान्य वापराबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे.
अमेरिकेतील ही घटना. लॉस एंजेलिस इथं राहणारी मेलानिया डार्नेलवर तिच्या नवऱ्याला संशय होता. मेलानियाला तिचा नवरा दररोज थकलेला पाहायचा. मग त्याच्या मनात विचार आला की ही दिवस भर असं काय करत असेल, ज्यामुळे ती इतकी थकलेली असते. अखेर या गोष्टीचा छडा लावण्यासाठी त्याने घरातच बायकोच्या नकळत सीसीटीव्ही कॅमरा लावला.दुसऱ्या दिवशी नवऱ्याला सीसीटीव्ही कॅमेरात जे दिसलं, त्यानंतर त्याला खूप मोठी धक्काच बसला. कारण त्याच्यासमोर सत्य आलं होतं आणि त्याला हे कळून चुकलं होतं की आपली बायको इतकी का थकते.
दिवसभर काय करायची त्याची बायको?
खरंतर त्याची बायको, तो कामला गेल्यानंतर घर आवरते. तसेच मुलांना सांभाळण्यात तिची संपूर्ण शक्ती वाया जाते. तिच्या नवऱ्याने कॅमेऱ्यात पाहिले की, त्याची तीन मुले तिला रात्रभर झोपू देत नाहीत आणि तिला सकाळी लवकर उठावे लागते. तसेच दिवसभर त्यांच्यासाठी जेवण, अंघोळ, नाष्टा सगळं काही करावे लागते. ज्यामुळे ती पूर्णपणे थकून जाते. महत्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी तिला एकटीला करायला लागत असल्यामुळे तिच्याकडे स्वत:साठी वेळ नसतो. हे चित्र पाहून तिच्या नवऱ्याला धक्का बसला.
अखेर या संशयी नवऱ्याच्या मनातली चुकचुकणारी पाल आता शांत झाली होती आणि त्याला आपल्या बायकोची मेहनत कळली होती. ज्यामुळे त्याने मुद्दाम हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे इतर लोकांनाही कळेल की घर आणि लहानमुल सांभाळणं हे सोपं काम नाही.