सामाजिक
सहा.वाहतूक निरीक्षक कांबळे विरोधात कर्मचारी लामबंद ; कारवाईची मागणी
चांदुर रेल्वे / अमोल ठाकरे
चांदुर रेल्वे आगारातील सहा. वाहतूक निरीक्षक दिनेश कांबळे हे कर्मचाऱ्यांसोबत उद्धटपणे वागत असून महिलांना हीन वागणूक देत असल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वरीष्ठना केलेल्या निवेदनातून केली आहे.
याआगारात कार्यरत व्हलक आणि वाहक यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत
सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. दिनेश कांबळे हे अरेरावीची भाषा वापरून माझी जिथे तक्रार करायची असेल तिथे करा असे बोलणे, काही कामगारांना हेतुपुरेस्पर त्रास देणे, कामगिरी अदला बदली नाही देणे, महिला कामगारांना रात्री उशिरापर्यंत कामगिरी लावणे व त्यांच्यासोबत द्विअर्थाने बोलणे. अश्या प्रकारची वागणूक देतात. त्यांच्या अश्या वागणूकीमुळे चालक/वाहकांना नाहक त्रास होऊन त्यांना मानसिक त्रास होतो. अशामुळे कामगारांच्या कामगिरीवर परिणाम होऊन रा.प.म. च्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या याच त्रासाला कंटाळून वाहक सौ. जयश्री तायवाडे यांनी आगार व्यवस्थापक, चांदुर रेल्वे यांना दि. ३०/१२/२०२३ रोजी लेखी तक्रार केली.
तसेच श्री दिनेश कांबळे हे कामगारांची कामगिरी लावताना एखाद्या कामगाराची रजा असून सुद्धा त्या कामगाराची कामगिरी लावुन व रोजंदारी चालक कम वाहक यांना कामगिरी न देता काही कामगारांना डबल ड्युटी देऊन आपल्या कामगिरीमध्ये हेतुपुरेस्पर हलगर्जीपणा करतात. उदा. दि ३ डिसेंबर २०२२ रोजी चालक श्री. निवल यांची रजा असून सुद्धा त्यांची कामगिरी नियत क्र. २२ वर लावण्यात आली होती. त्या दिवशी नियत क्र. २२ वर वेळेवर दुसरा चालक न मिळाल्याने १३.३० ची घुईखेड चांदुर रेल्वे ते घुईखेड व १५.३० ची चांदुर रेल्वे ते वाई बोथ ही फेरी रद्द करण्यात आली व १८.३० च्या चांदुर रेल्वे घुईखेड फेरीवर डबल ड्युटी मध्ये चालक पाठवावा लागला. याबतीत रा.प. मधील एका संघटनेने दि. ०५/०४/२०२३ रोजी आपणाकडे रीतसर तक्रार सुद्धा केली आहे. दि. २०/१२/२०२३ रोजी चालक कम वाहक यांना कामगिरी न देता त्या दिवशी काही चालकांना डबल ड्युटीवर पाठविण्यात आले. तसेच डिसेंबर २०२३ या महिन्यामध्ये
अनेक रोजंदारी चालक कम वाहक यांना २६ दिवस कामगिरी मिळाली नाही, पण अनेक चालक/वाहक डबल ड्युटीवर गेलेले आहे. त्यांचे असे कृत्य रा.प च्या हिताचे नसून यामुळे रा.प. चे आर्थिक नुकसान होऊन विद्यार्थी व प्रवाश्यांना त्रास होऊन जनमानसात रा.प. ची प्रतिमा मलिन होत आहे. ही गंभीर बाब असून याकडे रा.प. प्रसासनने लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच श्री. दिनेश कांबळे यांची मार्ग तपासणीमध्ये जाण्याची खूप ईच्छा असून त्यांची अशी धारणा आहे की, जर कामगारांनी आपली तक्रार केली तर आपली बदली मार्ग तपासणी पथकामध्ये होईल. कारण त्यांनी अनेकदा कामगाराजवळ असे म्हटले आहे की, मला लाईन चेकिंग मध्ये जायचं आहे, माझी तक्रार करा. म्हणून मार्ग तपासणी मध्ये
जाण्यासाठी ते जाणूनबुजून असे करत तर नसेल ना? असा प्रश्न उपस्थित होतो. तरीही वरील प्रकरणाची चौकशी करून सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री दिनेश कांबळे यांना रा.प. च्या नियमानुसार कारवाही करून कर्मचार्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे.