जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- खा.चव्हाण
बिलोली(प्रतिनिधि):
विरोधकांच्या कुठल्याही अमिषाला बळी न पडता मतदारानी माझ्यावर विश्वास ठेऊन मला भरघोस मताधिक्याने निवडुन देऊन खासदार म्हणुन काम करण्याची संधी दिली. जनतेच्या त्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित खा.वसंतरावजी चव्हाण यानी बिलोली येथे आज दि.१८ जुलै रोजी तालुका काँग्रेस कमीटीच्या वतिने आयोजित नागरी सत्काराला उतर देताना बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी शिक्षण सभापती संजयअप्पा बेळगे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस केदार पा.साळुंके ता.अध्यक्ष शिवाजी पा.पाचपिपळीकर माजी जि.प.सदस्य निवृती कांबळे मा.नगराध्यक्ष भिमराव जेठे मा.जि.प.सदस्य सुभाष गायकवाड युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी पा.शिंदे ,गंगाधर सोनकांबळे , गिरीधर पा.डाकोरे , प्रकाश पा.बडुरकर ,पांडुरंग रामपुरे,प्रकाश पोवाडे,वल्लीयोदिन फारुखी ,गंगाधर सोंडारे ,शिवसेना (उबाठा) ता.प्रमुख शिवकुमार बावणे,नागेंद्र पा.सांगवीकर, व्यंकट गुजरवाड ,सुनिल एंबडवार ,यांच्यासह आनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले की माझी लोकसभा निवडणुक लढण्याची आजिबात तयारी नसताना पक्षाने ऐन वेळी माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी या निवडणुकीत उतरलो पण मतदारानी माझ्यावर विश्वास ठेऊन विरोधकाच्या कुठल्याच अमिषाला बळी न पडता विरोधी पक्षातील दिग्जाना त्यांची जागा दाखावुन मला मत्ताधिक्यानी आपल्या जिवाभावाचा खासदार म्हणुन निवडुन देऊन काम करण्याची संधी दिलात त्या संधीच सोन करु हा खासदार तुमच्यासाठी सदैव तयार आसेल कदापी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे उपस्थिता समोर सत्काराला उत्तर देताना बोलत होते.तसेच येणाऱ्या देगलुर विधानसभा निवडणुकी संदर्भात इच्छुकानी कामाला लागावे मतदार संघातीलच उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार आसल्याचे या वेळी आवर्जून उल्लेख करत बिलोली व कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस व महाविकास आघाडी संचालक संख्याबळ पहाता अविश्वास का ? आणु नये आसा ही रोखठोक दणका दिला.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सविस्तर आसे प्रस्ताविक शिवाजी पा.पाचपिपळीकर यानी केले तर सुञसंलन दिलीप पांढरे यानी केले. आभार प्रकाश पोवाडे यानी व्यक्त केले. तर या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्यास तालुक्यातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.