खेळ व क्रीडा

अंतिम टेस्ट जिंकत इंग्लंड ने फेरले ऑस्ट्रेलियाच्या आनंदावर पाणी 

Spread the love
 

स्टुअर्ट ब्रॉड ला गोड निरोप

 इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंड ने विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडण्यात यश मिळवले आहे. आपली प्रतिष्ठा साबूत ठेवण्यासावबत स्टुअर्ट ब्रॉड ला गोड निरोप देण्यात इंग्लंड चा संघ यशस्वी ठरला आहे.

शेवटची विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडचा शेवट देखील गोड झाला आहे. नुकतंच स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती जाहीर केली होती. शेवटच्या दिवशी दोन विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडने कांगारूंची दैना उडवली. इंग्लंडने हा थरारक सामना 49 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे आता इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांची राख केली, असं म्हणावं लागेल.

अॅशेस मालिका कशी होती?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यांत पहिला सामना हा बर्मिंगघम इथे खेळवण्यात आला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला धुळ चारली आणि 2-0 ने आघाडी घेतली होती. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं अन् तिसरा सामना जिंकला. त्यामुळे मालिकेतील चुरस आणखी वाढली होती. मात्र, चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्वप्नाची ‘राख’ झाली.

अशी होती ब्रॉडची टेस्टमधील कारकीर्द?

स्टुअर्ट ब्रॉडने 2007 टेस्टमध्ये डेब्यू केलं होतं. त्याने पहिला टेस्ट सामना हा श्रीलंकेविरूद्ध खेळला होता. फलंदाजीच्या जोरावर त्याने 243 डावात 3,656 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1 शतक आणि 13 अर्धशतके आहेत. त्याच्या करियरमध्ये त्याने 20 वेळा 5 विकेट्स घेतल्या असून 3 वेळा 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. त्याने 243 डावात 3,656 रन्स केलेत. याशिवाय त्याच्या नावे 1 शतक आणि 13 अर्धशतके आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close