शकुंतलेचे नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन सुरु करण्यासाठी सर्वेक्षण पुर्णत्वस :-श्रीमती .पाण्डेय महाप्रबंधक भुसावल
शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपुरच्या अथक प्रयत्नला यश…तर सोबतच अचलपुर-चांदूर बाजार रेल लाइन सुद्धा जोड़न्यात यावी अशी सत्याग्रह समितिची मागणी
*दिपावलीच्या कालावधि मधे अचलपुर-मूर्तिज़ापुर प्रस्तावित झालेल्या ब्राडगेज सर्वे संदर्भात मध्य रेलवे भुसावल मंडलच्या महाप्रबंधक भेट घेऊन केली सत्याग्रहि यांनी चर्चा
अचलपुर प्रतिनिधी – किशोर बद्रटिये : शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिति अचलपुरची शेवटी केंद्र/राज्य प्रशासन सहित रेल मंत्रालयने दखल घेत शकुंतला रेल ट्रैक 52137-52138 चा अंतिम सर्वे चे टेंडर 3 कोटि 77 लक्ष मधे देऊन ड्रोन कैमेराने दिवाळी अगोदर केलेले आहे, यामधे पाहिला टप्पा अचलपुर-मूर्तिज़ापुर 77 किमी तर दुसऱ्या टप्प्यात मूर्तिज़ापुर-यवतमाल 112 किमी चा मार्ग ब्रॉडगेज मधे परावर्तित करण्याचे सर्वेक्षण कार्य ऑक्टोम्बर 2023 पासून सुरु करण्यात आलेले आहे,
तसेच ब्रिटिश कंपनीने अचलपुर-मूर्तिज़ापुर नैरोगेज रेलमार्गचे देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे शकुंतला रेल नेहमी साठी बंद करण्यात आली आहे, देशातील जे एक दोन मार्ग नैरोगेज मधून ब्राडगेज मधे रूपांतरित करण्यासाठी प्रस्तावित आहे, त्यामधे अचलपुर-मूर्तिज़ापुर(77 km)यवतमाल 112किमी हा रेल मार्ग आहे, त्यात प्रथम सर्वेक्षण निविदा काढून कंपनीच्या माध्यमातून दिवाळी कालावधित कंपनीने तो सर्वे पूर्ण केला आहे, त्याचे मैपिंग व डीपीआर डिसेम्बर 2023 मधे पूर्ण करुण केन्दीय रेल बोर्ड कड़े पुढील कार्रवाई करिता पाठविन्यात येईल, अशी माहिती मंडल भुसावलच्या महाप्रबंधक इति पांडेय मैडम यांनी 50 मिनटे चाललेल्या चर्चेत शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांना दिली
शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांनी महाप्रबंधक भुसावल यांची आज रोजी रितसर भेट घेऊन,चार जिल्हाला जोड़नारी शकुंतला रेल,190 किमीचा प्रवास करत शेतमालाला जैसे कापूस, संत्रा शेतकरी समस्या, मेलघाटचे पूर्ण देशात प्रसिद्ध लाल सागवान, मेलघाट निवासी यांच्या समस्या कशा नष्ट होवू शकतात या सर्व बाबिचा तंतोतन्त अभ्यास पूर्ण माहिती विषद करत रेल्वेचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावी व सोबतच चांदूर बाजार-अचलपुर 30 किमीचा मार्ग जोडण्यात यावा अशी मागणी शकुंतला रेल बचाव सत्याग्रहि गजानन कोल्हे, योगेश खानजोडे, राजेन्द्र जयसवाल,विजय गोंड़चोर, संजय जोशी, राजेश शाह यांनी केली, आणि महाप्रबंधक इति पाण्डेय यांच्या सकारात्मक प्रतिसादचे धन्यवाद व्यक्त केले,अतिशय महत्वपूर्ण सत्य माहिती पुरावा सहित मिळाल्याने शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांनी आंनद व्यक्त करत समाधान मानले .