सामाजिक

सुट्टी एन्जॉय करणे जीवावर बेतले ; पाच मित्रांचा बुडून मृत्यू 

Spread the love

नागपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                    विकेंड ला कुठेतरी एन्जॉय करण्यासाठी जाणे हा आजच्या तरुणाईचा छंद झाला आहे. अर्थात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मनसोक्त आनंद लुटणे ही भावना. पण त्यासाठी मादक पदार्थाचा उपयोग ही यातील गोम आणि त्यामुळेच अश्या ठिकाणी ज्या घटना घडतात त्यामुळे तरुणाई जीवाला तर मुकतेच परंतु कुटुंबाला नेहमीसाठी एक कटू आठवण देऊन जाते. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी पाच मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. घटना मोहंगाव झिल्पी येथे घडली आहे.

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सहा मित्र तळ्याच्या काठावर गेले होते. तलावातील पाणी बघून त्यांना पोहता येत नसतानाही पोहण्याचा मोह झाला व तो त्यांच्या जीवावर बेतला. चार मित्रांनी तलावात उडी घेतली ते बुडताना पाहून पाचवा मित्र त्यांना वाचवायला गेला व तोही बुडून मृत्यूमुखी पडला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली.

ऋषिकेश पराळे (२१, वाठोडा ) राहुल मेश्राम (२३, गीडोबा मंदिर चौक, वाठोडा), वैभव भागेश्वर वैद्य (२४, भांडेवाडी रोड, पारडी) शंतनू ( वय २३) अशी मृत तरुणांची नावे असून पाचव्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पराळे हा प्राजक्त मोरेश्वर लेंडे (३२, रमना मारोती चौक) यांच्या कारवर चालक म्हणून नोकरी करतो. त्याने शंतनू, राहुल मेश्रामला सोबत घेऊन तळ्याकाठी जाण्याचा प्लॅन आखला. ऋषिकेश शंतनू, राहुल आणि अन्य मित्रासह मोहगाव झिल्पी तलावावर पोहचला. त्याने डॉ. प्राजक्त लेंडे आणि त्यांचा मित्र वैभव वैद्य या दोघांनाही तेथे बोलावले.

ऋषिकेश, शंतनू, राहुल आणि त्याच्या मित्राला झिल्पी तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. चौघांनाही पोहणे येत नव्हते. सुरुवातीला तलावाच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. मात्र, ऋषिकेश खोल पाण्यात गेला. त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे गेले. चौघेही बुडायला लागले. त्यामुळे वैभव वैद्य हा त्यांना वाचवायला गेला. तोही बुडाला. हे सर्व तरुण प्राजक्तच्या समोर बुडाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close