समाजातील युवकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन शासना ची व देशाची सेवा करावी सुमित वानखेडे
आर्वी / प्रतिनिधी
ग्रंथालय हे ज्ञानसाधनेचे केंद्र आहे या ज्ञान केंद्राचा उपयोग करत युवकांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे व युवकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासनाची व देशाची सेवा करावी
वाचन संस्कृतीला बळ देणारे व ग्रंथालयीन संस्कृती जपणारे *सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे आयोजित कार्यक्रमात माननीय सुमित वानखेडे ( माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहाय्यक) प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रंथ प्रदर्शनीचे सुमित वानखेडे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले
याप्रसंगी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी ग्रंथालयाची माहिती व निर्मिती बाबत तसेच तेथे उपलब्ध असलेल्या ग्रंथाबाबत माहिती दिली.
ग्रंथालयाच्या वतीने सुमित वानखेडे यांचा पुष्पगुच्छ शाल व पुस्तक देऊन
सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित दादा भिवगडे
ग्रंथालयाचे शशिकला दहाट
भानुदासजी फुसाटे
सहदेवराव भगत
रामदासजी नाखले
सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी भिवगडे (पुरोहित)
गणेश पाटील अनिल खैरकर
मान्यवर उपस्थित होते
दिवंगत ट्विंकल निखाडे ( मुळे )
हिच्या स्मृती प्रित्यर्थ प्रा. डॉ विजया मुळे यांनी वाचन संस्कृतीचे महत्व पटवून देणारे फलक सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाला भेट म्हणून दिले.
याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाला मंदा सवाई, प्रज्ञा गावंडे विजेता नाखले ,नम्रता बनकर, आदर्श दहाट प्रशिक बनसोड ईशा ढोक वैष्णवी गराडे प्राजिता ढाणके गौरव बोबडे अक्षय राऊत प्रफुल्ल राऊत अनिकेत
निखिल ठाकूर बाजीराव मडावी गौरव कोल्हे इत्यादी सहकार्य केले.