आर्वीचे डॉ. भूषण दिवाकर ठोंबरे वर्ल्ड फेडरेशन ऑफ neurological society तर्फे न्यूरोसर्जन पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटी पुरस्काराने सन्मानित

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आर्वीच्या डॉ. भूषण ठोंबरे यांना जागतिक यंग न्यूरोसर्जन पुरस्कार जाहीर आर्वी :-आर्वी सारख्या छोट्या शहरातून शिक्षण घेऊन पुढे neurosurgery मध्ये पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यात संशोधनात्मक कार्य केलेल्या आर्वी येथील व सध्या अमरावती च्या पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत डॉ. भूषण दिवाकर ठोंबरे यांच्या कार्याची दखल वर्ल्ड फेडरेशन ऑफ neurological society ने घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केला. यंदा जागतिक स्तरावर असे पाच पुरस्कार जाहीर झाले असून यात ब्राझील, रोमानीया,युगांडा,व united स्टेट च्या डॉक्टर चा समावेश आहे. भूषण याच्या ज्या संशोधनपर कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला, ते कार्य Revolutionizing Brain Tumor Diagnosis: An insight into CNN Model’s Efficacy in CNS Tumor Analysis with Squash smear cytology ha आहे. भूषण यानी आपले शालेय शिक्षण कृषक इंग्लिश स्कूल, आर्वी येथून केले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून एमबीबीएस, topiwala नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई येथून मास्टर of surgery, MIMHANS, बंगलोर येथून Mch हा सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम तर बॉम्बे हॉस्पिटल येथून fellow ship केली. तो आर्वी येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. दिवाकर व डॉ. शोभा ठोंबरे यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या या दैदिप्यमान कार्याबद्दल सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत असुन आर्विच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल समस्त वर्धा जिल्हा वासियांना आनंद झाला आहेत..