शैक्षणिक

स्व.नंदलाल लोया कन्या विद्यालय आणि श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘ लोया डे ‘ साजरा

Spread the love

धामणगाव रेल्वे  / प्रतिनिधी

श्रीराम शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय नंदलाल लोया कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय येथे “लोया डे” साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम प्रमुख अतिथी रूपाने डॉ. दिलीप काळे माजी प्राचार्य संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती तसेच संस्थेचे संचालक गोपाल भूत, किशोर साकुरे,पत्रकार जिचकार उपस्थित होते मंचावर सौ.राधा गोपाल भूत मान्यवरांसह स्वर्गीय नंदलाल लोया कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.अर्चना राऊत, श्रीराम महिला महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर राऊत, स्वर्गीय दादारावजी अडसड शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य हर्षद मालधुरे,राधेश व गौरी भूत प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, शिवतांडव, व देवी स्तुती या नृत्याचे सादरीकरण करून करण्यात आली नंदलाल लोया डे निमित्ताने डॉक्टर काळे यांच्या द्वारा निर्मित संत गाडगेबाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी आकर्षक ठरली विद्यालयाने कापसापासून विविध वस्तू, जुन्या कापडापासून पिशव्या, पुष्पगुच्छ अशा प्रदर्शनीचे आयोजन केले होते तसेच यानिमित्ताने रांगोळी स्पर्धा, तीन दिवसीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अर्चना राऊत यांनी केले याप्रसंगी सौ.राधा गोपाल भूत या राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या अध्यक्ष नियुक्त झाल्याचे औचित्य साधून प्राचार्य सौ अर्चना राऊत व विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले शाळेच्या प्रांगणात आयोजित उपरोक्त कार्यक्रमांमध्ये सर्व स्पर्धक विद्यार्थिनींना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले दरवर्षी आयोजित उपरोक्त कार्यक्रमांमध्ये लोया आणि भूत परिवाराची उपस्थिती असते सदर परिवार विद्यार्थिनींवर पालक म्हणून सहकार्य करतो हे येथे उल्लेखनीय कार्यक्रमाच्या यशस्वी करिता ज्योती भूत, संजय बाळापुरे,अनिरुद्ध घुलक्षे,सुनिता ठाकूर, राजेश बनाइत, निशिकांत वासनिक योगेश गायगोले,संजय जाधव प्रा. सुरेश काळे,वृंदा जोशी मंगला दुधाट,भारती नवघरे,रवींद्र भोंगे,किशोर दारोकार, किशोर पांडव, गणेश उईके यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन सौ.माला जगताप,योगेश गायगोले व आभार संजय जाधव यांनी  मानले*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close