वाघाच्या कातडीसह दोन आरोपी ताब्यात
नागपूर व भंडारा वनविभागाची संयुक्त कार्यवाही…
*नव प्रहार/भंडारा(जि.प्र.)*
नागपूर वनविभागास प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करुन भंडारा विभागाच्या पथकासह संयुक्त कार्यवाही करुन वाघाच्या कातडी सह २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहिती नुसार गेल्या काही दिवसांपासून गुप्त माहिती प्राप्त झाली की पवनी येथे वाघाच्या कातडीची तस्करी होणार आहे. त्यावर वन विभाग नजर ठेवून होते. आज सकाळी दिनांक २१ जुन ला सापळा रचून तस्करी करणाऱ्या २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी निलेश सुधाकर गुजराथी रा. चंद्रपूर वय- ३३ वर्ष, विकास बाथोली बाथो रा. चंद्रपूर वय – ३१ वर्ष यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडून वाघाची कातडी १ नग, लांबी ८२ cm X रूंदी ७९ cm व Activa दुचाकी क्रमांक MH- ३४ CB २७१७ जप्त मुद्देमाल करण्यात आले आहे. तर आरोपी विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलामा द्वारे वनगुन्हा नोदविण्यात येणारं आहे. सदर सापडा पवनी वनपरिक्षेत्र, भंडारा वन विभाग भंडारा येथे रचण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रा.) नागपूर रमेश कुमार, भा व से, भारत सिंह हांडा, भा व से, उपवसंरक्षक नागपूर, राहुल गवई, भावसे, उपवनसंरक्षक, भंडारा यांच्या मार्गदर्शनात विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी. जी. कोडापे, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा) पवनी हिरालाल बारसगडे, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा) पवनी, प्रमोद वाडे (प्रा ) वन परिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, निलेश तवले, दिनेश पडवळ, आर एस पोरेते, थुले, वासनिक सर्व वनरक्षक आणि भंडारा वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सापडा यशस्वी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. पुढील तपास वाय. व्ही. नागुलवार करीत आहेत