अन.. चक्क साप तिच्या केसात घुसून खेळू लागला
सोशल मीडियावर दिवसाकाठी अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही युजर्स ना इतके आकर्षित करतात की अश्या व्हिडिओना कमी कालावधीत लाखो लाईक्स मिळतात. असे असले तरी ज्या व्यक्ती सोबत नेमका प्रकार घडतो त्याच्या जीवावर ही बाब बेतू शकते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत देखील असा काहीसा प्रकार घडू शकला असता. पण सुदैवाने तसे झाले नाही.
सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप अत्यंत भीतीदायक असा प्राणी आहे. तो अगदी छोट्याशा जागेत देखील स्वतःला बसवतो. सोशल मीडियावर असे व्हिडिओ पाहिले की, अनेक लोक घाबरतात. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला झोपलेली असताना साप तिच्या केसात फिरताना दिसत आहे. आणि त्या महिलेला याची काहीच खबर नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
शेतामध्ये मानवी वस्ती करून राहणाऱ्या घरांमध्ये अनेक वेळा साप घुसतात. अशावेळी साप विषारी आहे की बिनविषारी आहे, हे माहीत नसल्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो. आणि असाच एक धोका आता या व्हिडिओमध्ये (Viral Video) आपल्याला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक महिला दोन्ही हात डोक्याखाली ठेवून झोपलेली दिसत आहे. ही महिला गाढ झोपेत आहे. या महिलेने केस थोडेसे सैल बांधलेले आहे. यावेळी एक साप तिच्या केसात फिरताना दिसत आहे. हा साप सुरुवातीला तिच्या डोक्याच्या बाजूला सरपटत जातो. आणि नंतर हा केसांमध्ये रेंगाळत असतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जर या महिलेने थोडीशी जरी हालचाल केली असती तर तो चावण्याची दाट शक्यता होती.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत एका युजरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “प्लीज एवढी घेऊ नका” तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, “काय वेडेपणा आहे”सध्या सापाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.