डॉ. महेश चव्हाण दांपत्यांनी घेतली महाआरोग्य शिबिरातील रुग्णांची भेट
डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
दिनांक २३ मे २०२४ रोजी डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळाने आयोजित केलेल्या निःशुल्क महाआरोग्य शिबिरात उपचार व शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची डॉ. महेश चव्हाण आणि डॉ. सौ. निकिता महेश चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांच्या उपचारांबद्दल विचारपूस केली.रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वावर आधारित, डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळ गोरगरीब जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी निरंतर कार्यरत आहे. याच शिबिरातील सुमारे ४०० रुग्णांना उपचार आणि शस्त्रक्रियासाठी सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले होते.
दिनांक ०७ मे २०२४ रोजी, डॉ. महेश चव्हाण आणि डॉ. सौ. निकिता महेश चव्हाण हे रुग्णांच्या उपचारांची माहिती घेण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी सावंगी मेघे येथे पोहोचले. रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून डॉक्टर दांपत्ये भावविभोर झाले.
यावेळी डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळाचे मोहन भाऊ कदम ,अनुभव चव्हाण, डॉ. गुणवंत राठोड, रविभाऊ मुळतकर, महादेवराव जाधव, गोपालराव आडे, वैभव चव्हाण आणि सुशील राठोड उपस्थित होते.
डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळ दरवर्षी अशा शिबिरांचे आयोजन करते आणि गरजू रुग्णांना मदत करते. या शिबिरांद्वारे अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत.