सामाजिक

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते, व्यापारी मतदाराची यादीतील नावे गायब

Spread the love

 गैरहेतुने नावे गायब केल्याचा अडत्याचा आरोप ** -नावे गायब कशी झाली याची चौकशी करणार काेण –

 अंजनगांवसुर्जी ,( मनोहर मुरकुटे )

अंजनगाव सुर्जीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८ संचालकांच्या निवडणूक साठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली त्यानुसार एक हजार चारशे बाव्वन्न मतदारांच्या मतदारसंघ निहाय मतदारांच्या प्रसिद्ध झालेल्या अडत्या,व्यापाऱ्यांच्या अंतिम यादीमध्ये हेतू पुरस्परपणे घोळ केला गेल्याचा आरोप अडते,व्यापारी आणि अनुज्ञप्ती धारकांकडून केल्या जातअसल्याने, निवडणूक पूर्व मतदान याद्या तयार करणाऱ्या कृषीउत्पन्न बाजार समितीच्या कार्यशैलीवर पुनश्च प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सहकारातील वार्षिक परीक्षा म्हणून बाजार समित्यांकडे पाहिले जात असताना अत्यंत प्रतिष्ठितच्या अटीतटीच्या निवडणुकीत व्यापारी प्रतिनिधी म्हणून आडते व्यापारी मतदारसंघातून निवडून देणाऱ्या नियमित नोंदणीकृत अनुज्ञप्तीधारकांचीच मतदार यादीतील नावेच बाजार समिती सचिव व प्रशासनाकडून हेतू परस्परपणे, दूषित हेतूने गहाळ केल्याचा आरोप होत आहे.सदर व्यापारी अडत्यांच्या आरोपानुसार जेव्हापासून बाजार समितीत बाजार भरविला जातो,तेव्हापासून बाजार समितीचे ते नियमित नोंदणीकृत घटक असताना व एकाच वेळी सर्व नोंदण्या झाल्या असताना त्यातील काहींना मतदार यादीमध्ये स्थान देऊन आमची नावे दुष्ट हेतूने गहाळ केली असे यादीत नावे नसलेल्या व्यापाऱ्यांची म्हणणे असून या मतदार यादीत बऱ्याच नोंदणीकृत व्यापाऱ्यांची नावे गहाळ झाल्याचे आरोपात तथ्य असल्याचे निदर्शनास येत आहे ,सदर प्रसिद्ध झालेली अंतिम यादी सचिवाने कशाच्या आधारे व निकषावर तयार केली याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असून आपल्या घोटाळेबाजीस प्रसिद्ध असणाऱ्या बाजार समिती अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारे या नियमित मतदारांची नावे वगळली हे न उलगडलेले कोडे असूनच जिल्हा उपनिबंधकांनी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या निवडणूक बाधित करणाऱ्या, व्यापारी अडत्या कडून झालेल्या आरोपाची तातडीने लक्ष देत चौकशी करून कारवाई करणे गरजेचे झाले आहे
मी सन 2020, 21 पासून नियमितपणे बाजार समितीच्या लायसन्स धारक असून ,त्या बाबत मी दरवर्षी नूतनीकरण केले आहे त्या यादी मध्ये माझे नाव असतांना सुद्धा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमधून माझे नावच कमी करण्यात आले ,तो माझ्यावर अन्याय झाला असल्याचे अडते मनोहर मुरकुटे ह्यांनी सांगितले

मी सन 2020, 21 पासून नियमितपणे बाजार समितीच्या लायसन्स धारक असून ,त्या बाबत मी दरवर्षी नूतनीकरण केले आहे  त्या यादी मध्ये माझे नाव असतांना सुद्धा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या  मतदार  यादीमधून माझे नावच कमी करण्यात आले  ,तो माझ्यावर अन्याय झाला असल्याचे अडते मनोहर मुरकुटे ह्यांनी सांगितले

 

 

– सदर मुद्द्याबाबत बाजार समिती प्रशासक स्वाती गुडदे यांना विचारणा केली असता तात्पुरत्या याद्या प्रसिद्धीची जाहिरात केल्या गेली होती,मतदारांनी याद्या प्रसिद्ध झाल्यावर आक्षेप घ्यायला पाहिजे होता आता काहीही होणार नाही,अनुज्ञप्ती धारकांची एकही नाव सुटलेले नाही, ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात असे स्पष्ट केले

 

अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आहे आक्षेप घ्यायला पाहिजे होता,यावर उच्च न्यायालयाच पर्याय आहे, जर मोठ्या प्रमाणात हेतूपुरस्परपणे नावे गहाळ झाली असतील तर चौकशी केल्या जाईल व कारवाई केल्या जाईल असे विनायक कहाळेकर;जिल्हा उपनिबंधक अमरावती)
**********************

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close