शहरातील लेआऊट मध्ये सोयी सुविधा न देणा-यावर कारवाई करा
आक्रोश जनशक्ती संघटनेची मागणी.
वरूड/तूषार अकर्ते
वरूड नगरपरिषदेला आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीने दि.२८ जुन रोज बुधवारला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की मागील १० वर्षांपासून शहरामध्ये पडत असलेले नवीन ले-आउट धारकाला परवानगी देताना नियमानुसार सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या शिवाय परवानगी देता येत नाही. असा शासकीय आदेश असताना पन कुठल्याही सोयी सुविधा ले-आऊट मध्ये न करता परवानगी का देण्यात येत आहे. अशा ले-आऊट ला परवानगी मिळाली तर लेआऊट मधील नागरिकांच्या सोयी सुविधांचे काय, सध्या पावसाळा सुरू आहे व शहरांतील नवीन लेआउट मध्ये कुठेच रोड , नाल्या , इलेक्ट्रिक पोल , पाईपलाईन किंवा गार्डन अश्या कोणत्याच सोयी सुविधा या मध्ये झालेल्या दिसुन येत नाही. अशा प्रकारे वरूड नगरपरिषद प्रशासनाकडुन मनोपल्ली कारभार करून या नगरपालिकेवर अतिरिक्त भार देण्यात येत आहे. अशा ले आऊट मधील प्रश्नासाठी येथील संपूर्ण नागरीक त्रस्त असुन वारंवार सोयी सुविधेचा अभाव असल्याने नगरपालिकेच्या पाय-या झिजवताना दिसत आहे.तरी देखील अजुन पर्यंत या नवीन ले-आउटमध्ये नगरपरिषदेने कुठलाही निधी अद्याप पर्यंत दिला नाही.या ले आऊट मधील नागरिकांना कर भरून सुद्धा त्यांना कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. ज्या सोयी सुविधा शहरामधील नवीन लेआउट मध्ये असायला पाहिजे त्या सोयी सुविधा या ठिकाणी झालेल्या दिसत नसताना सुद्धा अशा लेआउटला परवानगी देण्यात आल्याने या मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप सुशिल बेले यांचा कडुन करण्यात आला आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या लेआऊटची चौकशी न करता व कुठल्याही गोष्टीची पाहणी न करता परवानगी दिली जात असल्याने नवीन लेआउट मध्ये शासकीय नियमाप्रमाणे सोयी-सुविधेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे मागील दहा वर्षात जे लेआउट नव्याने तयार झाले आहे अशा लेआउटची चौकशी करून प्रशासकीय नियम धाब्यावर बसवणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर वरिष्ठाकडुन तात्काळ कारवाई करण्यात यावी व अशा लेआउटच्या परवाना सुद्धा वरिष्ठपातळीवरून रद्द करण्यात यावा. येथील नागरिकांना पूर्णतः सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. अशी मागणी या पत्राव्दारे आक्रोश जनशक्ती संघटनेचे सुशिल बेले यांच्या तर्फे करण्यात आली आहे .