सावधान! नायलन मांजा आढळून आल्यास होणार कडक करावाई
ओंकार काळे / मोर्शी
नायलन मांजा मुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये या करिता नायलन मांजा बाळगणाऱ्या वर कडक कारवाई करण्याचे अमरावती ग्रामीण अधीक्षक यांचे आदेश!
दिनांक 14/ 1 /2025रोज़ी मकर संक्रांतीचा सण अमरावती ग्रामीण नागरिक मोठ्या प्रमाणावर पतंग उडून साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची खरेदी विक्री केली जाते. नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्ष तसाच टिकून राहतो.
नायलॉन मांजाच्या वापरामुळे बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. जसे गळा कापणे, चेहरा विद्रूप होणे, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होणे तसेच दुचाकी वाहन चालक नायलॉन मांजात अडकून गंभीर अपघात होता जीव पण जाऊ शकतो आणि तसेच आरोग्याला धोका निर्माण करतो. त्याचप्रमाणे नायलॉन मांजा खांबावर,रस्त्यावर तसाच अडकून राहतो त्यामुळे पर्यावरणास धोका संभवतो.
म्हणून गंभीर अपघात, आरोग्यास धोका आणि पर्यावरणास धोका होऊ नये याकरिता मकर संक्रांति सणाचा दि. 7/1/2025ते दि. 31/1/2025 या कालावधीत नायलॉन मांजा ऑनलाईन पद्धतीने किंवा कुरिअरद्वारे खरेदी किंवा विक्री व पुरवठा करताना किंवा जवळ बाळगताना आढळल्यास किंवा नागरिक व व्यवसायिक यांना नायलॉन मांजा ऑनलाइन ई कॉमर्स वेबसाईट द्वारे पुरविण्यास तसेच नायलॉन मांजा कुरिअरद्वारे वाहतूक करण्यासाठी सक्त मनाई आदेश जाहीर करण्यात आले आहे. या प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कलम 223 भारतीय न्याय संहितेप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि हे आदेश अमरावती ग्रामीण परिसरामध्ये 7 डिसेंबर2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहील तरी सर्व अमरावती ग्रामीण परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी केले आहे.