क्राइम

प्रियकरासोबत मिळून मुलाला आईकडून जीवे मारण्याचा प्रयत्न 

Spread the love

 मुंबई, / नवप्रहार मीडिया 

           पती पासून विभक्त रजत असलेल्या महिलेकडून प्रियकराच्या मदतीने मुलाला मारण्याचा प्रयत्न करम्यात आल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. मुलाच्या शरीरावर जळल्याच्या जखमा आढळून आल्याने त्याला वाडिया रुग्णालयात भरती करम्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीसांनी आई नीलम धावडे आणि प्रियकराला अटक केवई आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार निलम धाडवे ही दहिसर कोकणीपाडा परिसरात वास्तव्यास आहे. २०१९ पासून तिचा पतीसोबत वाद सुरू झाल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून पतीचे घर सोडून ती मुंबईत आली होती. पण, जून २०२३ मध्ये ती पतीकडून पाच वर्षांच्या मुलाला घेऊन आली. २८ सप्टेंबर रोजी महिलेच्या पतीला मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे फोन करून कळवण्यात आले होते. महिलेच्या पतीने मुंबईला येऊन मुलाची अवस्था पाहिल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. आपल्या मुलाला पत्नी आणि तिच्या प्रियकराने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close