स्त्रीशक्तीची संवाद यात्रा संपूर्ण राज्यात पण सुरुवात विदर्भातून
यवतमाळ( वार्ता )
शिवसेना( ठाकरे गट ) संपूर्ण राज्यात स्त्रीशक्तीची संवाद यात्रा सुरू झाली असून सुरुवात मात्र विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ, अमरावती लोकसभा मतदारसंघ, यवतमाळ लोकसभा मतदार संघातून आज दिनांक 17-01-2024 ला सुरु झाली. यवतमाळ लोकसभा क्षेत्रातील रायगाव विधानसभा मतदारसंघातील आज स्त्रीशक्तीची संवाद यात्रा आटोपून यवतमाळ येथील रेस्ट हाऊस ला पत्रकार परिषदेला या संवाद यात्रेचे महत्त्व सांगत असताना अनेक महत्त्वाच्या विषयावर शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांनी भर दिला. अनेक क्षेत्रात होणारा स्त्रियांवरील अन्याय त्यांची परिस्थिती महिलांचे बचत गट असो आशा वर्कर्स असो अंगणवाडी सेविका असो अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे पुढे म्हणाल्यात की समाजातील होणाऱ्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध महिला सक्षम असायला पाहिजेत. त्याचप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात महिलांच्या नियुक्ती सुद्धा करणे, महिलांच्या एकत्रिकरण करण्याच्या दृष्टीने गरजेचे असून स्त्रीशक्तीची ही संवाद यात्रा आहे.
ह्यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सौ शीलाताई देवरुखकर सेठ, सागरताई पुरी, नंदा ताई भिवगडे, पुष्पाताई जाधव, निर्मला विनकरे, काजलताई सह अनेक महिला उपस्थित होत्या त्याचप्रमाणे शिवसेनेचे माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर, शिवशेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, गजानन भाऊ डोमाळे,राजूभाऊ गायकवाड प्रवीण भाऊ पांडे, संजय भाऊ रेंगे, योगेश शिरसाट सह अनेक शिवसैनिक व अनेक महिला या बैठकीला उपस्थित होत्या.