हटके

मानलं रे पठ्ठ्या….. इथे एक सापडेना अन् तो दोन दोन मुलींना घेऊन करत  होता रोमान्स

Spread the love

 

नवी दिल्ली  / नवप्रहार मीडिया

देशाची राजधानी दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या लोकांना कुठलीही लाज , हया  वाटत नसल्याचे मागे घडलेल्या अनेक घटनांवरून समोर आले आहे. मागील दिवसात मेट्रो मध्ये प्रेमी युगलाचे चाले पाहून प्रवास करणाऱ्या लोकांनी लाजेने मान खाली घातली होती. नुकताच दिल्ली वरून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मेट्रोतील नसून मेट्रोच्या पुला खालचा आहे. आणि मुख्य म्हणजे हा व्हिडीओ शाळकरी मुलांचा आहे. येथे शाळेच्या गणवेशात असलेला ऐक मुलगा दोन मुलींना किस करताना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर यावेळी हा प्रकार मेट्रोच्या आत नसून मेट्रो ब्रिजखाली सार्वजनिक वाहतुकीच्या बाहेर समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये शाळेच्या गणवेशातील एक मुलगा दोन मुलींना किस करताना दिसत आहे. तिन्ही मुले पुलाखाली उभे राहून असे वागत आहेत. @Raka440 नावाच्या युजरने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे.

यासोबत युजरने कॅप्शन लिहिले आहे की, ‘दिल्ली मेट्रो ब्रिजखाली स्कूल ड्रेसमध्ये अभ्यास सुरू आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने शेअर होत आहे. तुम्हीही पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

दरम्यान, तरुणाई सार्वजनिक ठिकाणी असे अश्लिल कृत्य करणं ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. फक्त दिल्लीच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या भागातून अशा घटना समोर आल्या आहेत. यातील काही घटनांचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक जोडपं दिल्ली मेट्रोमध्ये किस करताना दिसले होतं. अशा घटनांनंतर दिल्ली मेट्रो पूर्णपणे सतर्क झालं असून अशा घटना घडू नयेत यासाठी बारीक लक्ष ठेवून आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
2
+1
0
+1
0
+1
4

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close