राजकिय

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा 

Spread the love
हिंगोली / नवप्रहार डेस्क 

         राज्यातील राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. सकाळी एका पक्षात असणारा राजकीय नेता संध्याकाळ होई पर्यंत कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो. हिंगोली येथील ठाकरे गटाचे खासदार यांनी शिंदे गटाच्या दिन आमदारांची भेट घेतल्याने हे राजकीय भूकंपाचे संकेत तर नव्हे ना अशी चर्चा रंगत आहे.
 या चर्चेचं कारण ठरलं आहे तो एक फोटो. उद्धव ठाकरेंच्या नवनिर्वाचित खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या दोन आमदारांची गुप्त भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भेटीसाठी ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर पोहोचले. अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरही उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील मात्र अजून समोर आला नाही. नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार आहेत.
जिल्ह्याच्या कामासाठी ते माझ्याकडे आले होते. आमदार संतोष बांगरही त्यांच्यासोबत होते. मी दोघांशीही चर्चा केली, त्यामध्ये कोणतंही राजकारण नाही. राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेब मला जो आदेश देतात, त्याचं मी पालन करतो, त्यामध्ये कुठेही राजकारणाचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. चहा घेताना गप्पा होतात, पण या गप्पा राजकारणाच्याच असतात असं नाही.
अब्दुल सत्तार पालकमंत्री आहेत, मी त्यांच्याकडे कामासाठी गेलो. नागेश आष्टीकरही तिकडे कामासाठीच आले असतील. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. योगायोगाने मी तिकडे असताना नागेश आष्टीकरही आले. आम्ही एकमेकांना जय महाराष्ट्र केलं, असं संतोष बांगर यांनी स्पष्ट केलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close