राजकिय

राज्यात पुन्हा राजकीय नाट्य रंगणार 

Spread the love

डॉ. नीलम गोरे शिंदें गटात तर पंकजा मुंडे काँग्रेस मध्ये शामिल होण्याची चर्चा 

शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क

             मागील काही दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अजित दादा यांची समर्थकांसह शिंदे – फडणवीस सएकार मध्ये शामिल होण्याची बातमी ताजी असतांनाच राज्यात आणखी एक राजकीय नाट्य घडणार आहे. ठाकरे गटाच्या डॉ. नीलम गोरे या शिंदे गटात तर भाजपच्या सरचिटणीस पंकजा मुंडे या काँग्रेस मध्ये शामिल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाकरे गटातील विधान परिषदेचा एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आजच या आमदारासह काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आज शिंगे गटात प्रवेश करणार आहेत.

ठाकरेंच्या विश्वासू नेता आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हा नेता विधान परिषदेचा आमदारही आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज दुपारीच हा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. . या आमदारासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत.

बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीश कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे.

त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचेच निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती. ठाकरे गटातून अजून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. अशातच विधान परिषद आमदारासह इतरही महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार विप्लव बजोरिया आणि आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ठाकरेंकडून कोण शिंदेंकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे राज्यात राजकीय भूकंप सुरू झाला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत. अशातच ठाकरेंकडून शिंदे गटाकडे जाणाऱ्यांचा ओघ अजून सुरूच आहे.

तर दुसरीकडे भाजपाच्या  राज्य सरचिटणीस आणि मागील काही काळापासून  भाजपा कडून वाळीत टाकण्यात आलेल्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतल्यान त्या काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार आपल्या समर्थकांसह शिंदे फडणवीस सरकार मध्ये शामिल झाले आहेत. अजित पवार यांच्या सोबत धनंजय मुंडे असल्याने आणि त्यांना राष्ट्रवादी च्या गोटातून मंत्रिपद मिळाल्याने पंकजा मुंडेंची अस्वस्थता वाढली आहे. आणि यामुळे ते काँग्रेस मध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close