भाजपाच्या वतिने गांधी जयंती निमित्त “स्वच्छता ही सेवा” उपक्रम,पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार, नेर:- नवनाथ दरोई

नेर:- नवनाथ दरोई
२ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून १आॅक्टोबर “स्वच्छता हि सेवा” हा उपक्रम देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी राबविण्याचे संपूर्ण देशाला आव्हान केले होते.नेर शहरात स्वच्छता हि सेवा अभियानाला आज सकाळी १० वाजता शिवाजी नगरातील उधाणाची साफसफाई करून सुरुवात करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छता ही सेवा” अभियान राबविण्याचे व त्याच माध्यमातून त्यांना स्वच्छांजली अर्पण करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश प्राप्त झाले होते.त्यानुसार हे अभियान राबविण्यात आले.गणेशोत्सवाची दोन दिवसाची मिरवणूक शांतपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासह होमगार्ड यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडल्यामुळे नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्यासह होमगार्ड, कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे नेर तालुका अध्यक्ष अनिल राठोड, पूरुपोत्तम लाहोटी,राजेंद्र निकोटे,प्रितम गावंडे, आशिष खोडे,आकाश राऊत,दिलेश्र्वर महल्ले,विना खोडवे, शिवानी गुगलीया,संतोष देशमुख, दिनेश पांगारकर, राजेंद्र देउळकर,चंदू कुचेकर व अन्य भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.