शैक्षणिक

सर्वसामान्य कुटुंबातील कु.शामल अवचित अमरावती विद्यापीठातून प्रथम.

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार

घाटंजी लगतच्या आकपुरी येथील श्री शिवराय विद्यालय, आकपुरी या शाळेची माजी विद्यार्थीनी व एका सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत मुलगी कु.शामल मधुकरराव अवचित हिचा गुणगौरव सत्कार घेण्यात घाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून एम. ए. गृहअर्थशास्त्र या विषयात तीने 83 टक्के गुण घेऊन प्रथम मिरीट येऊन यवतमाळ जिल्ह्यासह आपल्या आकपुरी गावाचं नाव रोशन केलं.जीवनात येणाऱ्या आर्थीक समस्यांवर मात करून कसे यश संपादन करता येते हे तिने दाखवून दिले.शाळेच्या वतीने तिचा शाळा, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . संध्या जिरापूरे, तसेच सर्व शिक्षक श्री. संजय ठाकरे. श्री हरेंद्र निमसरकर, श्री. अनिरुद्ध कांबळे श्री. अनिल डहाके, श्री अमोल अवचित श्री. निखिल घायवान , श्री संदिप राठोड तसेच श्री. नरेंद्र बागल उपस्थित होते.
शामलने आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाताना येणा-या अडचणींवर मात करत जाण्यासाठी मार्गदर्शन केले.आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांना तसेच शिक्षकांना देते. शामल सध्या भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाभुळ‌गांव येथे सिनिअर कॉलेजला प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तिला पुढे जाऊन P-H-D करायची असून ती विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श प्रेरणास्थान ठरली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close