क्राइम

पोलिस खात्यात असलेला बापच मागील १वर्षापासून खेळत होता मुलीच्या अब्रूशी 

Spread the love

अमरावती /.विशेष प्रतिनिधी

               अमराती शहरातून एक अत्यंत लाजीरवाणी बाब समोर आली आहे. पोलिस खात्यात असलेल्या बापाकडून पोटच्या मुलीवर मागील एक वर्षापासून लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे शेतच जर कुंपण खाऊ लागले तर या चर्चेला उधाण आले.आहे. मुलीच्या तक्रारी वरून पोलिस कर्मचाऱ्यावर पॉक्सो सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिस पित्याने सलग वर्षभर लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार एका 24 वर्षीय तरुणीने अमरावतीच्या राजापेठ पोलिसांत केली आहे. या खळबळजनक प्रकारानंतर नात्याला काळीमा फासणाऱ्या पोलीस बापाविरोधात बलात्कार,विनयभंग आणि पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुलीवर अत्याचार होत असताना आरोपी बाप हा अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीने 4 जून रोजी सकाळी सात वाजता पीडित मुलीला घाणेरडा स्पर्श केला. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वारंवार होणारा त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

लहाणपणीच लैंगिक जवळीक साधण्याचा नराधमाचा प्रयत्न

तरुणी २०१५ साली आठवीत असताना आरोपीने लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आईला बाहेरगावी पाठवून आरोपीने शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे. या प्रकारानंतर ही संपूर्ण माहिती आईला सांगितली.

मुलगी आणि बायकोला जीवे मारण्याची धमकी

शारिरीक अत्याचार केल्याची माहिती बाहेर गेली तर सर्वांना मारून टाकीन, अशी धमकी आरोपी बापाने तरुणी आणि तिच्या आईला दिली होती. अमरावती शहरातील या धक्कादायक प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी बापावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close