हटके

तो बनवत होता रील इतक्यात आली ट्रेन आणि ….

Spread the love

जहांगीराबाद (युपी )/  नवप्रहार मीडिया 

                सध्या तरुणाईला रील बनवून व्हाट्सअप ,फेसबुक आणि इंस्टाग्राम वर टाकण्याचे वेड लागले आहे. रिल्स बनवून टाकण्यासाठी आणि लाईक्स व कॉमेंट्स मिळविण्यासाठी तरुणाई वाट्टेल त्या थराला जाण्यास तयार असतात. अश्या वेळेस अनेक अपघात देखील घडत असतात. अशीच एक घटना उत्तरप्रदेश च्या जहांगीराबाद येथे घडली आहे.

सध्या उत्त्त्तर प्रदेेश मधून असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाला रेल्वे रुळावर रिल काढण्याच्या आपला जीव गमवावा लागल्याचे दिसत आहे. फरमान असे या मुलाचे नाव असून तो जहांगीराबादचा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाव रतरुणांच्या बाईक स्टंटचे  रेल्वेमध्ये, बसमध्ये केलेल्या डान्सचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे रिल्स काढणे त्यांच्या जीवावरही बेतू शकते, मात्र त्याची पर्वा न करता जीव धोक्यात घालून काही तरुण नको ती स्टंटबाजी करताना दिसत असतात.

घटनेच्या दिवशी फरमान आपल्या मित्रांसोबत मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. यावेळी तो रेल्वे रुळावर रिल शूट काढण्यासाठी थांबला. रेल्वे रुळावर रिल शूट करताना दुर्देवाने त्याला पाठीमागून येणारी ट्रेन दिसली नाही, ज्यामुळे त्याला थेट ट्रेनने जोरदार धडक दिली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फरमान रिल काढण्यासाठी रेल्वे रुळाच्या दिशेने जाताना दिसत आहे. तसेच त्याच्या कानात इअरबडही आहेत, त्यामुळेच त्याला ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही. काही क्षणात भरधाव ट्रेन येते अन् फरमानला थेट धडक देते. ट्रेनची धडक इतकी भयंकर होती की तो थेट हवेत उडाल्याचेही यामध्ये दिसत आहे.

दरम्यान, या घटनेत फरमानचा जागीच मृत्यू झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी असे जीव धोक्यात घालून रिल्स न बनवण्याचा सल्ला दिला आहे, तसेच काही जणांनी असे रिल्स काढणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. एका क्षणात जीव गमावल्याने अनेकांनी कमेंटमध्ये दुःख व्यक्त केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close