अखिल भारतीय बारी महासंघाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र सादर अधिवेशना पूर्वी समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी पत्र सादर मागण्या मान्य न झाल्यास विधी मंडळावर मोर्चाची समाज बांधवांची तयारी सुरु

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी शेगाव जि.बुलडाणा येथे उत्साहत पार पडले. अधिवेशनात देशातील जवळपास पंधरा राज्यातील तब्बल ६० हजार चे वर समाज बांधवांनी उपस्थिती लावली.होती. अधिवेशनामध्ये
महाराष्ट्रातील व केंद्रातील सन्माननीय मंत्री महोदय व राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, आमदार व खासदार, विरोधी पक्ष नेते अशा दिग्गज अतिथिंनी अधिवेशनाला उपस्थित राहून समाजाच्या आर्थिक सामाजिक राजकीय उत्थानासाठी सादर केलेल्या मागण्या समजून घेऊन त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने समाज बांधवांना आश्वासित केले होते.त्यामध्ये
माननीय उपमुख्यमंत्री दे्वेंदजी फडणवीस, यांनी व्हिडिओ संवादाद्वारे अधिवेशनातील उपस्थित सर्व समाज बांधवांशी संवाद साधला होता. महाराष्ट्र शासन समाजाला निश्चितपणे न्याय देईल असे आश्वासित केले होते व सदरचे बाबीबाबत
दिवाळीपर्यंत शासन स्तरावर बैठक लावून सर्व मागण्या संदर्भात चर्चा करून मागण्या मार्गी लावण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु अद्याप ही मिटींगचे आयोजन न झाल्याने विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दिनांक 9 डिसेंबर 2023 पासून नागपूरला सुरू होत आहे.
त्या अगोदर बारी समाज बांधवांची बैठक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्यांचे उपस्थितीत लावून .
01) पावसाळी अधिवेशनात शासनाने जाहीर केलेल्या राष्ट्रसंत शिरोमणी श्री रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुर्जी अमरावती येथे निर्माण करण्यासंबंधीची कारवाई.
02) बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रसंत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ जाहीर करणे.
03) बारी समाजाचे मुख्य पीक पान मळा, पान पिंपरी व मुसळी अशा औषधी पिकांना प्रोत्साहन देण्यासंबंधी लागवडी करता अनुदान देणे तसेच पिक विमा व संशोधन केंद्र उभे करून विशेष योजना लागू करणे.
04) संत शिरोमणी राष्ट्रसंत श्री रूपलाल महाराज यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी.
05) नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने बारी समाजाचे पानमळे, पान- पिंपळीचे व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. व इतर अनेक मागण्यांची पूर्तता करण्यात यावी.ह्या विषयीचे पत्र नुकतेच अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी घोलप व अधिवेशन समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्यांना केले असून, सदरचे बाबींबाबत शासनाने विचार न केल्यास समस्त बारी समाजाचे वतीने हिवाळी अधिवेशनावर मोर्चाची तयारी सुद्धा करणार असे पत्रात म्हटले आहे ह्याबाबात शासनाचे प्रतिनिधी काय भूमिका घेणार ह्याकडे बारी समाज बांधवांचे लक्ष लागले आहे