तो मृत्यूला शिवून आला ; दैव बलवत्तर म्हणून बचावला
रेल्वेने अनेक अपघात घडतात.रेल्वे प्रशासनाकडून अनेक खरबरदारीत्मक उपाय करून देखील अपघात घडत असतात. शहरातून जाणाऱ्या रेल्वे लाईन वर असलेल्या रेल्वे गेटवर रेल्वे विभागाकडून खरबरदारी घेण्याच्या सूचना लिहिलेल्या असतात. रेल्वे गेट बंद असतांना आपण त्या वाचतोही पण त्याला फारसे गांभीर्याने घेत नाही. काही रेल्वे गेट ला पूर्वी सारखी खालून जाळी नसल्याने नागरिक त्याच्या खालून वाहन काढण्याचा प्रयत्न करतात.असे करणे धोक्याचे आहे हे माहीत असतांना देखील ते जुमानत नाही. आणि आपला जीव गमावून बसतात. त्यानंतर दोष रेल्वे विभागाला देऊन नुकसान भरपाई मागितली जाते. अनेक वेळा काही लोकल लीडर अश्या घटनेचे भांडवल करण्यासाठी मोर्चे वगैरेचे आयोजन करतात. रेल्वे गेट बंद असतांना एका बाईक स्वाराने रेल्वे लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न केला . पण इतक्यात रेल्वे आल्याने तो गोंधळाला व बाईक सोडुन बाजूला झाला. रेल्वेने क्षणात त्या बाईक ला टक्कर दिल्याने ती हवेत फेकल्या गेली. यावेळी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे . आणि युजर्स त्यावर कॉमेंट्स देखील करत आहेत. तो मृत्यूला शिवून आल्याचे अनेक युजर्स बोलत आहेत.
ट्रेन अपघाताशी संबंधित ही हैराण करणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावर नेटिझन्सही मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तर काहींनी या मुलाविरोधात कारवाईची मागणीही केली आहे.
व्हायरल होत असलेला काही सेकंदांचा व्हिडिओ पाहून रेल्वे क्रॉसिंगवर अनेक वाहने उभी असल्याचे दिसून येते. दोन्ही बाजूंनी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सर्व वाहने ट्रेन पास होण्याची आणि ग्रीन सिग्नलची वाट पाहत उभी आहेत. मात्र एका दुचाकीस्वाराला यासाठी धीर नव्हता. ट्रेन येण्याआधीच रुळ ओलांडणार असं त्याने मनाशी ठरवलं. पण ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली. तुम्हाला फ्रेममध्ये दिसेल की मुलगा रुळाजवळ पोहोचताच एका बुलेटच्या वेगाने सुपरफास्ट ट्रेन आली. तो मुलगा लगेच बाईक तिथेच सोडून मागे पळत सुटला. एका धक्कादायक दृश्यात, बाईक ट्रेनच्या इंजिनला धडकली आणि हवेत उडून गेल्याचे आपण पाहात आहोत. फ्रेममधले हे दृश्य पाहून कुणीही म्हणेल की तो मुलगा मृत्यूला स्पर्श करून परतला आहे.
रेल्वे अपघाताशी संबंधित हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याची माहिती आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर jorgitx2_ या हँडलने शेअर केला आहे.