क्राइम

जबरी चोरीच्या घटनेतील आरोपी अटक,अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

Spread the love

बोधिसत्व काळे आणि अबरार यांचे पोलीस विभागाकडून कौतुक

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापुर पोलिस स्टेशन हद्दीत २२ जानेवारी रोजी ग्राम शहापुर फाट्याजवळ भारत फायनान्स कंपनीचे प्रतीनिधी यश राठोड हे दैनंदीन वसुलीचे कामकाज करुन त्यांचे दुचाकीने दत्तापुर येथे परत येत असतांना त्यांचे पाठीमागुन दोन अज्ञात इसमांनी मोटर सायकलवर येवुन त्यांना धक्का मारुन रस्त्यावर पाडले व त्यांचे जवळील रोख रक्कम व टॅब हिसकावून घेतला. त्याचवेळी धामनगाव येथील प्रसारमाध्यम प्रतीनिधी बोधीसत्व काळे व अबरार हे तिवसा येथुन त्यांचे काम आटोपुन परत येत असतांना त्यांना सदर घटना निदर्शनास आली. प्रथमदर्शी त्यांना सदर घटना ही अपघात वाटल्याने ते मदती करीता पुढे सरसावले असता लगेचच सदर घटना ही अपघात नसुन जबरी चोरीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणुन जबरी चोरी करुन पळून जाण्याच्या बेतात असलेल्या दोन्ही आरोपींना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी सचीन पंधरे राहणार यवतमाळ यास पकडण्यात ते याशस्वी झाले. तर त्याचा साथीदार नामे विशाल सहारे हा मोटरसायकलने घटनास्थळावरुन पसार झाला होता. सदर घटनेची माहीती बोधीसत्व काळे व अबरार यांनी दत्तापुर पोलिस स्टेशन यांना दुरध्वनीव्दारे दिल्याने दत्तापुर पोलिस स्टेशन येथील पोलीस पथक त्वरीत घटनास्थळावर दाखल झाले व आरोंपीस ताब्यात घेतले.सदर घटनेची माहीती मिळताच अमरावती स्थानिक गुन्हेचे पथक दुस-या आरोपीच्या शोधार्थ यवतमाळ येथे रवाना झाले होते. यवतमाळ येथे आरोपीचा शोध घेवुन आरोपी विशाल सहारे यास गुन्हयात वापरलेल्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आलेले आहे व पुढील तपास करिता दत्तापुर पोलिस स्टेशन यांना सुपुर्द करण्यात आले आहे. घटना घडत असतांना पिडीतास मदत व आरोपी यांना पकडण्यात दाखविलेले धैर्य व समयसूचकता याबाबत प्रसारमाध्यम प्रतीनिधी बोधीसत्व काळे व अबरार यांना अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे शुभेच्छा देण्यात आली आहेत. तसेच नागरीकांनी सदैव सभोवताल घडणा-या घटनांबाबत जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close