Uncategorized

शहरात नव्याने होणाऱ्या दोन भुयारी आणि एक फुटओव्हर ब्रिज मुळे वाहतूक कोंडी सुटणार

Spread the love

धामणगाव रेल्वे ,

शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न व दिवसेंदिवस वाढतच असलेली वाहतूक कोंडी आता २ नव्याने तयार होणाऱ्या रेल्वे भुयारी मार्ग व रेल्वे फाटकाजवळ  फुटऒव्हर ब्रिज मंजूर झाल्याने आणि यांच्या निविदा सुद्धा निघाल्याने धामणगाव व परिसरातील लोकांच्या आवागमनाची मुख्य कोंडी संपणार असून या महत्वाच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होत असल्यामुळे धामणगाव तथा परिसरात आमदार प्रताप अडसड यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे

धामणगावातील वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या दूर करण्याकरिता दोन अंडर ब्रिज लवकरात लवकर मंजूर व्हावे याकरिता तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट आ.प्रताप अडसड यांनी दिल्लीत  घेतली  होती त्यावेळी महत्त्वाच्या अश्या ठरलेल्या भेटी दरम्यान गोयल यांनी आमदार अडसड यांना धामणगाव येथील प्रमुख समस्या असलेल्या रेल्वे अंडर ब्रिज समस्या कायमस्वरूपी लवकरात लवकर दूर करून देण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्ती म्हणून केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाने सध्या आहे त्याच्या बाजूला म्हणजेच गौरक्षण जवळ एक तसेच भडभड्या पुलाजवळ मोठ्या जड वाहनाकरिता दुसरे आणि रेल्वे फाटकावर फूट ओव्हर ब्रिज असे एकूण तीन  ब्रिज मंजूर केले आहेत  धामणगाव व परिसरातील सर्वाधिक महत्त्वाच्या समस्येचे निराकरण झाले आहे

सदर कामाच्या निविदा सुद्धा निघाल्याचे नगर परिषदेच्या प्रशासन विभागाकडून माहिती मिळाली आहे

धामणगाव विधानसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या रेल्वे महामार्ग परिक्षेत्रात ग्रामस्थांना वाहतुकीचा मार्ग अधिक सुलभ व्हावा याकरिता आमदार प्रताप अडसड यांनी वेगाने पाऊल उचलले  तळेगाव दशासर चांदुर रेल्वे बायपास अमरावती  या मध्यंतर रेल्वे क्रॉसिंग आहेत नागपुर वरून यवतमाळ ला जाण्या करिता या रेल्वे फाटकावर अनेक वेळा वाहनधारकांना उभे राहावे लागते त्यामुळे येथे उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. टीमटाला या  गावाजवळून रेल्वे लाईन गेली.  या परिसरातील लोकांना रेल्वे लाईन क्रॉसिंग करावी लागते त्यामुळे येथे उड्डाणपूल किंवा अंडर ब्रिज महत्त्वाचा आहे. तसेच चांदुर रेल्वे शहरा जवळील मागील अनेक दिवसापासून रेल्वे उड्डाण पुलाचे काम धीम्या पद्धतीने चालू आहे. त्या कामाला अधिक गती मिळावी म्हणून तसेच धामणगाव रेल्वे शहरांमधील प्रस्तावित दोन्ही अंडर ब्रिज च्या बाबतीत टेंडर लवकरात लवकर लागावे याकरिता व चांदूर रेल्वे वासीयांनी जी मागणी केली होती त्याबाबत आमदार प्रताप अडसड यांनी केंद्रीय  रेल्वे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट सुद्धा घेतली होती या पाचही कामांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून अहवाल मागवून कारवाई करणार असल्याचे गोयल यांनी आमदार अडसड यांना सांगितले होते

————————————-

 

 

मी केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाचा आभारी आहे-अडसड केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने मी मागण्या केल्याप्रमाणे दोन अंडर ब्रिज व सोबतच रेल्वे फाटकाजवळ फूट ओव्हर ब्रिज मंजूर केले असल्यामुळे आपल्या धामणगाव तथा परिसरातील लोकांची सर्वात महत्त्वाची कोंडी दूर झाली असून यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहेत तसेच व्यापारी विद्यार्थी आणि आवागमन करणाऱ्या बंधू-भगिनींना या तिन्ही मार्गामुळे खूप लाभ होणार असल्यामुळे मी केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या मागणीला पूर्ण केल्यामुळे मला अत्यानंद होत असल्याची आमदार अडसड यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close