गळफास लावून युवकाची आत्महत्या
शिवणी/मोगरा येथील घटना
लाखनी:- तालुक्यातील लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवणी/मोगरा येथील एका युवकाने स्वतःच्या घरी धाब्याच्या लाकडी मयालीला नायलान दोरी बांधून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरूवारी (ता.१२) दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.विनोद मंगल शेंडे(वय ३८ वर्ष, रा.शिवनी/मोगरा) असे मृतक युवकाचे नाव आहे.
मृतक विनोद मंगल शेंडे याला डोक्याचा त्रास होता.या त्रासामुळे तो दारूचे अधिक सेवन करीत होता.साधारणतः एक आठवड्यापुर्वी मृतकाची पत्नी व मुले माहेरी पाहुणे म्हणुन गेले होते. त्यामुळे सध्या मृतक घरी एकटाच होता.हि एकाकीपणाची संधी बघुन अति दारुच्या नशेत मृतकाने स्वतःच्या घरी लाकडी मयालीला नायलान दोरी बांधून गळफास लागून आत्महत्या केली.
दरम्यान,गुरुवारी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हृदयनारायन यादव लाखनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक देविदास बागडे पो.स्टे.लाखनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रूग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले.शोकाकुल वातावरणात (१३सप्टेंबर) रोजी स्थानिक स्मशानभूमीत मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक विनोदला आई,पत्नी,एक मुलगा व मुलगी आहे.लाखनी पोलिस ठाण्यात मर्ग क्र.३५/२०२४ कलम १९४ बी.एन.एस. नुसार आकस्मिक मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास लाखनी पोलिस करीत आहेत.