घरी झोपलेल्या इस्मावर बिबट्याचा हल्ला.

केसलवाडा येथील घटना घरात शिरला बिबट.
भंडारा/मोहाडी : तालुक्याच्या पूर्व भागास नागझिरा अभयारण्य तर दक्षिण भागास कोका अभयारण्य वसला आहे त्या अभयारण्यास लागून केसलवाडा(जंगल) हे गाव वसले आहे त्यामुळे या गावात वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दि.21 नोव्हेंबरला पहाटे 4 चे सुमारास ईश्वरदास गजभिये हे घरी छपरात झोपले असता घरी बिबट आला व त्याने त्यांच्या डोक्यावर वार केला आरडाओरडकेल्याने बिबट घरात शिरला घरच्या लोकांनी आरडा ओरडकेल्याने
बिब्बट शिवारात पळून गेला व जखमेवर प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे उपचार करण्यात आला.
मोहाडी तालुक्यातील करडी जांभोरा पालोरा केसलेवाडा खडकी बोंडे डोंगर देव व ढीवरवाडा हे गाव नागझिरा व कोका या अभयारन्यास लागून आहेत. या अभयारन्यात मानवास जाण्यास मनाई आहे त्यामुळे वन्यप्राणी जंगलाच्या गर्भात न जाता ते गावाच्या दिशेने शिरगाव करतात व शेतशिवारात मोठ्या प्रमाणे पिकांचे नुकसान करतात तसेच शिवारात चरणाऱ्या गुरांना मारतात त्याचप्रमाणे घरी झोपलेल्या लोकांना सुद्धा जखमी करतात असाच प्रकार दि.21 नोव्हेंबर रोजी केसलवाडा येथे घडला.
केसलवाडा येथील ईश्वर दास यादवराव गजभिये हे घरी छपरा झोपले असता बिबट घरी येऊन त्यांच्या डोक्यावर वार केला त्यांनी आरडाओरड केली असता तो बिबट थेट त्यांच्या घरात शिरला घरात घरचे लोक झोपले असता त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे तो बिबट शिवारात पडून गेला जखमी अवस्थेत ईश्वर दास गजभिये यांना प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे उपचार करता आणण्यात आले करडी येथील डॉ. हर्सिता फिदार. आरोग्य सेविका गंगासागर पवारे. परिचर अमित गैरखेडे यांनी त्यांच्यावर उपचार करून सुट्टी दिली.
मोहाडी तालुक्यातील