क्राइम

हॉटेल मध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

Spread the love

तरुणीची सुटका ; पाच लोकांवर गुन्हा दाखल 

केडगाव / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                बायपास रोडवरील हॉटेल राधेश्याम येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसाया बाबत गीपनिय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळताच त्यांनी याठिकाणी सहकाऱ्यांसह सुनियोजित पद्धतीने छापा टाकला असता पश्चिम बंगाल राज्यातील तरुणी आणि पाच लोक हा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी तरुणीची सुटका करत 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलं असुन दोन लोकांना ताब्यात घेतले आहे.

केडगाव बायपास रोडवरील हॉटेल राधेश्याम येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदार मार्फत कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक यादव आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी तत्काळ कारवाई करण्यासाठी पंचासह रवाना झाले. हॉटेल राधेश्याम येथे बनावट ग्राहक पाठवून त्यानंतर छापा टाकला असता हॉटेलच्या तळघरातील एका खोलीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. त्या ठिकाणी हजर असलेल्या दोघांना नावे विचारली असता आकाश सुभाष गायकवाड (वय 24 वर्षे, रा. भिंगारदिवेमळा, झोपडी कँटीन, नगर), शहानवाज वहाब हुसेन (वय 21 वर्षे, रा.तपोवन, नगर) असे सांगितले. तसेच, हॉटेल मालक सुरज (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या सांगण्यावरून ग्राहकांकडुन पैसे घेवून त्यांना रुम उपलब्ध करुन देऊन महिलेकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची कबुली दिली.

या कारवाईत 33 हजार 230 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार गणेश धोत्रे यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापारास प्रतिबंध सन 1959 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करीत आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक मनोज कचरे, गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, राजेंद्र औटी, गणेश धोत्रे, गोरख काळे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, सतिष भांड, संतोष जरे, महिला पोलीस पल्लवी रोहकले, पुनम नरसाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close