सामाजिक

क्रांतीवीर बिरसा मुंडा प्रेरणास्थान आ. सुधाकर आडबले

Spread the love

ठाणा पेट्रोल पंप येथील बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम

जवाहरनगर :- भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राण पणाने लढा देणारे, इंग्रज सरकारला सळो
की पळो करून सोडणारे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची लढाई ही सर्व आदिवासी समुदासाठी अत्यंत स्फुर्तीदायी असून बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार सुधाकर आडबले यांनी ठाणा पेट्रोल पंप येथील चीमुरकर हनुमान मंदिर प्रांगणात आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा बहुउद्देशिय समिती द्वारे आयोजीत बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.
या प्रसंगी पदवीधर मतदासंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी,सरपंच पुरुषोत्तम कांबळे, धनंजय तिरपुडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा ठवकर, जि. प. सदस्य आशा डोरले,जि. प. सदस्य प्रेम वणवे, प. स. सदस्य कल्पना कुर्झेकर, ग्रा. प. सदस्य, निखिल तिजारे, विक्की डोईफोडे,चेतन उईके, ज्ञानेश्वर मडावी, मनोजसिंह गोंड मडावी, लक्ष्मी सोयम, आशिष कलनायके तसेच समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व समस्त समाजबांधव उपस्थित होते. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. दोन्ही आमदारांनी उपस्थित बांधवांशी संवाद साधला. रावाधीन ढेमसा ग्रुप, खुटवंटा, जिल्हा चंद्रपूर यांनी आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. प्रास्ताविक कैलाश टेकाम संचालन आशा सोयाम , कविता मडकाम तर आभार प्रा.विष्णू भलावी व वासुदेव वाढवे यांनी केले.
यशस्वितेसाठी लक्ष्मी सोयाम, सुनीता पंधरे, भागवत मडकाम,वासुदेव वाढवे, मालन मडावी, सुनिता पंधरे ,अश्विन राजगडे, नागोराव मडकाम, कविता मडकाम, मनीष खलनायके, शेखर पुसाम, अरविंद उईके,अनिल तिरकाम, सुरेखा मडकाम, प्रियंका वाढवे, वामन वाढवे, रमेश खांडवाये, गजेंद्रसिंह करवेती, कमल ईडपाते, चेतन उईके, आशिष खलनायके तुलसीराम कोकुडे, भास्कर गावंडे , देवराव धुर्वे, व अन्य समाज कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.
………………………………….
सागर बागडे, जवाहरनगर, भंडारा

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close