सामाजिक

झटाळा येथिल विवाहीत्येचा विहीरीत पडून संशयास्पद मृत्यू

Spread the love

मृतांच्या भावाने केला पतीने घातपात केल्याचा आरोप

घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार.


घाटंजी तालुक्यातील झटाळा येथील विवाहीत महीला शुभांगी चंद्रकांत बेजपवार वय ३० वर्ष हीचा आज सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना पारवा पोलिसांना झटाळा गावक-या कडून मिळाली. प्रथम दर्शनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पारवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतक महिलेचे शव ताब्यात घेण्यात आले असता मृतक पडलेल्या विहिरी जवळ बकेट व मृतकाच्या पायाला दोर अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. तसेच मृतक शुभांगी च्या माहेरच्या मंडळींनी शूभांगीचा विहीरत पडून अकस्मात मृत्यू नसून तिचा पती व सासरच्या मंडळींनी तिला मारून विहिरी टाकल्याचा आरोप पारवा पोलीसात तक्रारीत केला.मयत महीलेचा भाऊ अनिकेत व तीची आई ह्यांचे मते शूभांगीचा व तिच्या पतीचा लग्नाच्या नंतर पासून ब-याच वेळा आपसात भांडणे होत होती त्यात काही वर्ष मृतक माहेरीच होती पण,आपसी तडजोडीने आता ते परत एकत्र राहत होती. एकत्रितपणे राहत असताना ही पतीपत्नी वाद सूरूचं होता त्यात पतिने व तिच्या सासरा मंडळींनी संगनमत करून तिचा घात केला असून विहिरीत टाकून अकस्मात मृत्यूची बनावट केली असा आरोप केला आहे. तसंच तक्रार ही पारवा पोलीस ठाण्याला दील्याच कळते.मृतक शुभांगी हीचा मृतदेह पंचनामा व उत्तरणीय तपासणी करिता घाटंजी ग्रामीण वृग्णालयात आणण्यात आला असून वृग्णालय मृतदेह पाहताच मृतकाचे आई व नातेवाईक यांनी टाहो फोडत संमंधीत संशयित आरोपीस अटक करून योग्य न्याय द्यावा ही एकचं मागणी लावून धरली.मृत महिलेच्या पश्चात दोन मूल असल्याचे कळते.सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पारवा ठाणेदार प्रविण लिंगाडे साहेब,पोलिस उपनिरीक्षक राहूल वानखडे,अनिल दीनगुले व पोलिस सहकारी पुढील तपास करत असल्याचं कळते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close