सामाजिक
पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात रक्षाबंधन उत्सव साजरा.
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
दिनांक 30 ऑगस्ट 2023 ला यवतमाळ जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांना राखी बांधण्याकरिता जिल्ह्यातील अनेक महिलांनी राखी बांधून आशीर्वाद घेतले.
माननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी प्रत्येक महिलांच्या हस्ते राखी बांधून घेऊन त्या सर्व महिलांचा मानसन्मान केला यावेळी अनेक महिलांशी संपर्क साधला असता, आम्ही दरवर्षी संजू भाऊला राखी बांधत असतो कारण संजय भाऊ राठोड हे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या महिलांच्या सक्षमीकरिता महिलांच्या पाठीशी उभे असतात.
यावेळी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख पराग भाऊ पिंगळे,हरिहर भाऊ लिंगायत, शैलेश ठाकूर व इतर सर्व प्रमुख उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1