आई आणि मुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ
मोर्शी (तालुका प्रतिनिधी)दि
मोर्शी शहरातील कॉलनी परिसरातील शिवाजीनगर येथील राहते घरात आई आणि मुलाचे प्रेत पेटी दिवानच्या आतमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस सूत्राकडून शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील स्वर्गीय गणेश कापसे यांची पत्नी नीलिमा गणेश कापसे वय 45 वर्ष व मुलगा आयुष गणेश कापसे वय 22 वर्ष हे दोघेही आपल्या स्वतःच्या घरात राहत होते परंतु नीलिमा हिचे वडिलांनी आपल्या मुलीला सतत पाच ते सहा दिवसापासून दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आज तिचे वडील कोंढाळी वरून मोर्शीला आले. त्यांनी पोलिसां ठाण्यात गेले व त्यांनी पोलिसांना असे सांगितले की माझी मुलगी फोनवर पाच ते सहा दिवसापासून रिस्पॉन्स देत नाही हे बघता पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती मोर्शी पोलीस स्टेशनला दिली लगेच मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे व त्यांची अधिनस्त पोलीस चमू यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी कापसे यांच्या घराजवळील परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घराचे दार उघडून बघितले असता त्यांना चक्क पेटी दिवाण मध्ये नीलिमा व आयुशचे प्रेत आढळून आले शेवटी कॉलनी परिसरातील अवाक झालेल्या नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने गर्दी केली सदर नीलिमा गणेश कापसे व आयुष गणेश कापसे यांच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे.नीलिमा कापसे ही एमआरजीएस धारणी मध्ये काम करीत असून आयुष हा शालेय शिक्षण घेत असल्याचे कळते.